रेल्वेस्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफार्म तिकीट ५० तर पार्किंग ३० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST2021-08-25T04:33:59+5:302021-08-25T04:33:59+5:30

.......... असे वाढले दर २०१९ प्लॅटफार्म : १० रुपये, पार्किंग : २० रुपये २०२० ...

Expensive to send to the railway station, platform ticket 50 and parking 30 rupees! | रेल्वेस्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफार्म तिकीट ५० तर पार्किंग ३० रुपये!

रेल्वेस्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफार्म तिकीट ५० तर पार्किंग ३० रुपये!

..........

असे वाढले दर

२०१९ प्लॅटफार्म : १० रुपये, पार्किंग : २० रुपये

२०२० प्लॅटफार्म : १० रुपये, पार्किंग : २० रुपये

२०२१ प्लॅटफार्म : ५० रुपये, पार्किंग : ३० रुपये

...................

पार्किंगही महाग

रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग वाहन करण्यासाठीच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. दुचाकी वाहने ठेवण्यासाठी २४ तासांचे ३० रुपये चारचाकी वाहनांसाठी ६० रुपये शुल्क आकारले जात आहेत. पार्किंगचे कंत्राट देण्यात आले असून पार्किंगच्या शुल्कात दरवर्षी वाढ केली जात असल्याने याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

.............

गावी जाऊन सोडणे परवडले

रेल्वे विभागाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये केले असून एवढे पैसे भरून चंद्रपूर रेल्वे गाडीने प्रवास करता येतो. त्यामुळे प्लॅटफार्म तिकीट काढण्यापेक्षा नातेवाइकाला त्याची गावाला जाऊन सोडणे परवडेल.

- विनय शहारे, प्रवासी

........

कोरोना संसर्गाच्या नावावर रेल्वे प्लॅटफार्म तिकिटाचे दर वाढविले होते. पण आता सर्व सुरळीत झाले असतानासुद्धा हे दर कमी केले नाही. त्यामुळे आम्हाला भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही सुद्धा एक प्रकारची लूटच आहे.

- संतोष वाढई, प्रवासी

..........................

कोट

रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र हे दर कमी करण्यासंदर्भात अद्याप कुठल्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याने तेच दर कायम ठेवण्यात आले आहे.

- जनसंपर्क अधिकारी

Web Title: Expensive to send to the railway station, platform ticket 50 and parking 30 rupees!