महात्मा गांधीजींचा अपमान करणाऱ्यांना हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:58 IST2019-02-07T00:57:42+5:302019-02-07T00:58:48+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या.

Expel those who insult Mahatma Gandhiji | महात्मा गांधीजींचा अपमान करणाऱ्यांना हद्दपार करा

महात्मा गांधीजींचा अपमान करणाऱ्यांना हद्दपार करा

ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या.
तसेच महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नत्थुराम गोडसे याच्या जिंदाबादचे नारे लावले. त्यामुळे हे कृत्य करणाºयांना देशातून हद्दपार करण्याची मागणी अर्जुनी मोरगाव विधानसभा युवक काँग्रेसने तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गांधीजींचा अपमान करणे म्हणजे देशातील सर्व जनतेचा अपमान करणे होय. त्यामुळे अशा लोकांना देशामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही.
अशा देशद्रोहींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी ही या वेळी दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात अर्जुनी मोरगाव विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत, सडक अर्जुनी न.प.चे सभापती रेहान शेख, संतोष भंडारी, महेश सोनवाने, विकास डोंगरे, उज्ज्वल लांजेवार, मनोज राऊत, स्वप्नील राऊत, तोषराम चुटे, मंगेश पंचभाई, अमन मेश्राम, शरद नागपुरे, वसंत मडावी, राज खोब्रागडे, सुरेंद्र मडावी, अनिल नान्हे, प्रज्वल लांजेवार, मनोज राऊत, राजा पठाण, रोहीत बडोले यांचा समावेश होता.

Web Title: Expel those who insult Mahatma Gandhiji