बयवाडा येथे शिवारफेरी-क्षेत्रीय दिन कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:02+5:302021-01-25T04:30:02+5:30

सरपंच नत्थू बावनकर यांच्या शेतात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक अरुणा गायधने, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनेवाने ...

Excitement of Shivarpheri-Regional Day program at Baywada | बयवाडा येथे शिवारफेरी-क्षेत्रीय दिन कार्यक्रम उत्साहात

बयवाडा येथे शिवारफेरी-क्षेत्रीय दिन कार्यक्रम उत्साहात

सरपंच नत्थू बावनकर यांच्या शेतात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक अरुणा गायधने, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनेवाने व अरविंद उपवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी हरभरा पीक लागवड पद्धत यामध्ये पेरणी यंत्राद्वारे पेरणी, शून्य मशागत पेरणी यंत्राने लागवड व रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड त्याचे महत्त्व या विषयावर चर्चा करण्यात आली. पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, पक्षीथांबे, फोरोमन ट्रॅप (कामगंध सापळे), ५ टक्के निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क इत्यादी तयार करणे व वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आला.

यानंतर रविकांत पृथ्वीराज उके यांच्या शेतात मोहरी पिकाची पाहणी करून गळीत धान्य पिकाचे महत्त्व तसेच मोहरी पीक लागवडीस असलेला वाव, पिकावरील कीड -रोग ओळख व नियंत्रण उपाययोजना, तसेच पिकाचे विक्री व्यवस्थापन याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक परिस्थिती पाहणी करण्यात आली. यावेळी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: Excitement of Shivarpheri-Regional Day program at Baywada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.