सर्वांना शुध्द व मुबलक पाणी मिळावे
By Admin | Updated: August 10, 2014 23:05 IST2014-08-10T23:05:44+5:302014-08-10T23:05:44+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करीत असताना लोकवर्गणी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणि हागणदारीच्या अटीमुळे बऱ्याचशा पाणी पुरवठा योजना रखडलेल्या होत्या.

सर्वांना शुध्द व मुबलक पाणी मिळावे
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करीत असताना लोकवर्गणी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणि हागणदारीच्या अटीमुळे बऱ्याचशा पाणी पुरवठा योजना रखडलेल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असे. मात्र शासनस्तरावरून गेल्या वर्षभरामध्ये जारी केलेल्या धोरणात्मक सुधारणेमुळे आता सर्व ग्रामीण जनतेस शुध्द व मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल व योजना लवकर पूर्ण होतील असे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ग्रापापू यू.एन. वाकोडीकर म्हणाले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेत विभागीय भारत निर्माण कक्ष कार्यालयातून सावरकर, उपविभागीय अभियंता तुरकर, उपविभागीय अभियंता जितेद्र चव्हाण, उपविभागीय अभियंता एस.आर. शर्मा यांच्यासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा काझी, सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, शाखा व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये सुधारित शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती प्रभारी उपकार्यकारी अभियंता एस.आर.शर्मा यांनी दिली.
काझी यांनी भूजलाची पाण्याची पातळी व पाणी अडवा पाणी जिरवाबाबत ताहिती दिली. जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी यांनी पाणी गुणवत्तेसंदर्भात व पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजीबाबत माहिती दिली. सोबत पाणी हे जीवन आहे. त्याचा विनास करू नका असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता प्रिती माकोडे यांनी तर आभार राजेश उखळकर यांनी मानले. कार्यशाळेला तृप्ती साकुरे, व्ही.डी. मेश्राम, दीपाली साखरे व साधना डुभरे यासह सर्व गटसमन्वयक गट संसाधन केंद्र व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)