मूलभूत कर्तव्यांबद्दल सर्वांनी जागरूक असावे

By Admin | Updated: September 16, 2014 23:50 IST2014-09-16T23:50:29+5:302014-09-16T23:50:29+5:30

विद्यार्थ्यांनी मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून विद्यार्थी दशेतूनच आपल्या अधिकार व कर्तव्याबद्दल जागरूकता असावी असे प्रतिपादन न्यायाधीश बी.एस. कार्लेकर यांनी केले. येथील सरस्वती

Everyone should be aware of basic duties | मूलभूत कर्तव्यांबद्दल सर्वांनी जागरूक असावे

मूलभूत कर्तव्यांबद्दल सर्वांनी जागरूक असावे

अर्जुनी/मोरगाव : विद्यार्थ्यांनी मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून विद्यार्थी दशेतूनच आपल्या अधिकार व कर्तव्याबद्दल जागरूकता असावी असे प्रतिपादन न्यायाधीश बी.एस. कार्लेकर यांनी केले. येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (दि.१३) आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मंत्री यांच्या अध्यक्षतेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
न्या. कार्लेकर यांनी, स्त्री-पुरूष समानतेचे तत्व जोपासणे, व्यसनापासून जूर राहणे, भ्रमणध्वनीचा मोजकाच वापर करणे, इंटरनेटचा फक्त ज्ञान मिळण्यापुरताच वापर करण्याचा सल्ला दिला. तर प्राचार्य मंत्री यांनी, विद्यार्थी ज्ञानोपासनेकरिता विद्यालयात येतात. राष्ट्राचे आदर्श नागरिक घडविणे व समाजकार्यात भाग घेणे या गोष्टींची आवश्यकता आहे आणि याकरिता मुलभूत कर्तव्यांचे पालनही त्यांच्याकडून अपेक्षीत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन करून आभार प्रा. पठाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बुरडे, प्रा.आय.एच.काशिवार यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Everyone should be aware of basic duties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.