कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:22+5:302021-04-07T04:30:22+5:30
गोंदिया : राज्यात सर्व ठिकाणी अंशत: लॉकडाऊन सुरू होत असून आपल्या जिल्ह्यातही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक
गोंदिया : राज्यात सर्व ठिकाणी अंशत: लॉकडाऊन सुरू होत असून आपल्या जिल्ह्यातही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर नव्याने ३० एप्रिलपर्यंतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जारी केले. यामध्ये जिल्ह्यात जमावबंदी, रात्री
व आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाऊन अशा विविध निर्णयांबाबत आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचेही प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावेळेस कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत असून यासाठी आता प्रतिबंधात्मक उपाययोजना
राबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन प्रशासनासोबत उभे राहणे आवश्यक असल्याचे
जिल्हाधिकारी मीना यांनी आवाहन केले आहे. जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी सोमवार ते शुक्रवारचे सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत पाच हून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ तसेच शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत कोणत्याही सबळ/ अतितातडीच्या कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी असेल.