इटियाडोह धरणाचा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:36+5:30
इटियाडोह धरणापासून हे अंतर सुमारे ८ किमी. आहे. रविवारी (दि.२२) सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ होता. त्यामुळे लोक रविवारी बाहेर पडले नाही. त्यामुळे ही माहिती रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजतादरम्यान कळली. लगेच गोठणगाव-इटियाडोह शाखा कार्यालयातील कर्मचारी व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी त्या स्थळावर पोहचले. तात्पुरती डागडुजी केल्यानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले.

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा चिचोली नवीन ते तिबेटकॅम्प दरम्यान रविवारी (दि.२२) फुटला. या कालव्याच्या पाळीवर असलेल्या रस्त्याच्या खालच्या भागाला भगदाड पडले आहे. याद्वारे कालव्यातून वाहणारे बरेच पाणी वाया गेले. कालवा फुटलेल्या ठिकाणी डागडुजी करण्यात आली असून वाहणारे पाणी बंद करण्यात आल्याचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
इटियाडोह धरणापासून हे अंतर सुमारे ८ किमी. आहे. रविवारी (दि.२२) सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ होता. त्यामुळे लोक रविवारी बाहेर पडले नाही. त्यामुळे ही माहिती रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजतादरम्यान कळली. लगेच गोठणगाव-इटियाडोह शाखा कार्यालयातील कर्मचारी व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी त्या स्थळावर पोहचले. तात्पुरती डागडुजी केल्यानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले. सिंचनासाठी धरणाचे पाणी देण्याची १० दिवसांची खेप असते. ही खेप सोमवारी (दि.२३) संपणार असल्याने रविवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता पाणी बंद केले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच कालवा फुटल्याचे कळले असे उप विभागीय अभियंता भिवगडे यांनी सांगितले.
इटियाडोह धरणाचे कालवे अनेकदा फुटतात. ते जीर्ण झाले आहेत. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. यासाठी निधीच उपलब्ध करून दिला जात नाही. कालव्यात गाळ साचला आहे. धरणाच्या निर्मितीनंतर गाळ उपसा झालाच नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी झाली आहे. आधीपासून नियोजित असलेले पूर्ण क्षमतेचे पाणी कालव्यातून सोडल्यास कालवा फुटण्याची भीती असते. तर कमी पाणी सोडल्यास शेवटच्या टोकावर पूर्ण क्षमतेने पाणी पोहचत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड होते. इटियाडोह धरणाच्या कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण करणे महत्वाचे आहे.