सरपंचाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर समीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST2021-01-19T04:31:21+5:302021-01-19T04:31:21+5:30
तालुक्यातील एकूण नऊ ग्रामपंचायतीत ३० प्रभागात एकूण ८१ सदस्य निवडून देण्याची प्रक्रिया पार पाडली. यात भाजपचे ४३ सदस्य तर ...

सरपंचाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर समीकरण
तालुक्यातील एकूण नऊ ग्रामपंचायतीत ३० प्रभागात एकूण ८१ सदस्य निवडून देण्याची प्रक्रिया पार पाडली. यात भाजपचे ४३ सदस्य तर काँग्रेसचे ३६ सदस्य निवडून आल्याचा दावा त्या त्या पक्षांकडून केला जात आहे. यामध्ये पाऊलदौना आणि मानागड येथील एक एक सदस्याचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी अपक्षाला आपल्याकडे खेचण्यास प्रयत्न असून, या खेळीत कुणाला यश मिळते याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये कावराबांध, कारुटोला आणि मुंडीपार या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असून, या तिन्ही ११ सदस्यीय ग्रामपंचायती आहेत. या तिन्ही मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपने एकहाती सत्ता स्थापन केल्याचा दावा केला जात आहे. तर कोटरा, सातगाव आणि पोवारीटोला येथे काँग्रेसने दावा केला आहे. कोटजमुरा, पाऊलदौना, मानागड येथे भाजप समर्थित पॅनलनेच बाजी मारली आहे. आता सरपंच निवडून देण्यासाठी आरक्षणाची सोडत निघाल्यावर काय समीकरण बनतील, याची वाट बघावी लागेल.