धान लागवड नसतांनाही सातबारा उताऱ्यावर नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:36+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानाची मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानपिक घेतले जाते. धान खरेदी करणाऱ्या संस्था शेतकऱ्याची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्र ारी वारंवार होत आहेत. यावर्षी विक्रमी धान खरेदी झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदलाचे प्रयोग केले. तालुक्यात हजारों हेक्टरवर हे प्रयोग झाले.

धान लागवड नसतांनाही सातबारा उताऱ्यावर नोंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात धान उत्पादन घेतले नसतांनाही तलाठ्याकडून बोगस सातबारा उतारे देण्यात आले. या आधारावर वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मोठया प्रमाणावर धान विक्र ी केल्याचा गंभीर आरोप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालकांनी धान खरेदी करणाऱ्या संस्थेच्या आयोजित सभेत केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानाची मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानपिक घेतले जाते. धान खरेदी करणाऱ्या संस्था शेतकऱ्याची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्र ारी वारंवार होत आहेत. यावर्षी विक्रमी धान खरेदी झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदलाचे प्रयोग केले. तालुक्यात हजारों हेक्टरवर हे प्रयोग झाले. यावरून निश्चितपणे धान लागवडीचे क्षेत्र घटले. रोगराईमुळे उत्पादनात घट ही ठरलेलीच असते. तरी सुद्धा विक्र मी धान खरेदी हा संशोधनाचा विषय आहे.
नुकताच एका सभेत आरोप करण्यात आला. या आरोपामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. यातील कारणे काहीही असोत. मात्र या कारणांपर्यंत प्रशासनाने पोहचून यातील तथ्य शोधून काढण्याचे धाडस करणे अत्यंत आवश्यक आहे. एकतर व्यापाºयांचा धान खरेदी केला जाऊ शकतो.
दुसरे कारण राज्यात आधारभूत हमीभाव अधिक असल्याने जिल्हा सीमेला लागून असलेल्या राज्यातून विक्रीला धान येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धान विक्र ी करताना सातबारा उतारे आवश्यक असतात.असे सातबारा उतारे येतात कुठून याचा शोध घेणे अगत्याचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी हा धान वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातून येत असल्याचा आरोप केला आहे. त्या जिल्ह्यातून हा धान इथपर्यंत एखाद्या धान खरेदी केंद्राशी साटेलोटे असल्याशिवाय पोहोचतोच कसा? हा कळीचा मुद्दा आहे. मुळात शेतकऱ्यांनी दोन्ही हंगामात कोणते पीक घेतले यांच्या शेतात जाऊन तलाठ्यांद्वारे सातबारा उताऱ्यावर नोंदी घेतल्या जातात का? धान विक्र ीच्या वेळी अचूक सातबारा उतारे दिले जातात का? पडिक क्षेत्र असतांनाही धान लागवडीचे सातबारा उतारे दिले तर जात नाही ना? प्रत्यक्षात मका लागवड असतानाही धान व मका ही दोन्ही पिके विक्रीसाठीचे एकाच गटाचे वेगवेगळे सातबारा उतारे दिले तर जात नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याची योग्य शहानिशा केल्यास बिंग फुटू शकते. मात्र यासाठी प्रशासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.
याद्या प्रकाशित करा
उन्हाळी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांची गाविनहाय यादी तलाठ्याने प्रमाणित करून तहसील कार्यालयात सादर करावी. या याद्यांवर ग्रामसेवक, कृषी सहायक व संबंधित गावचे सरपंच यांची स्वाक्षरी घेऊन ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर प्रसिध्द करावी. यापुढे दोन्ही हंगामाच्या पीक लागवडीच्या याद्या याचपद्धतीने प्रसिध्द कराव्यात अशा सूचना तहसीलदार विनोद मेश्राम यांनी १० जून रोजी एक पत्र काढून तलाठ्यांना दिल्या आहेत.