विद्यापीठाच्या अटींमुळे अनेक महाविद्यालयांचा प्रवेश सुकर
By Admin | Updated: August 10, 2014 23:04 IST2014-08-10T23:04:56+5:302014-08-10T23:04:56+5:30
नागपूर विद्यापीठाने गतवर्षी अनेक महाविद्यालयांवर विविध कारणांमुळे प्रवेशबंदी घातली होती. मात्र यावर्षीच्या नवीन सत्रासाठी काही अटींच्या अधीन राहून त्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश

विद्यापीठाच्या अटींमुळे अनेक महाविद्यालयांचा प्रवेश सुकर
नवेगावबांध: नागपूर विद्यापीठाने गतवर्षी अनेक महाविद्यालयांवर विविध कारणांमुळे प्रवेशबंदी घातली होती. मात्र यावर्षीच्या नवीन सत्रासाठी काही अटींच्या अधीन राहून त्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सूट दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय अनेक विद्यार्थ्यांची तारांबळही दूर होत आहे.
अनेक महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची नियुक्ती केलेली नव्हती. त्यामुळे जी महाविद्यालये नियमित शिक्षकांची नियुक्ती करतील त्याच महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा व नामांकन घेतले जाईल, अशी भूमिका रा.तु.म. नागपूर विद्यापीठाने घेतली आहे. ज्या महाविद्यालयांना सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झालीत अशा महाविद्यालयांनी ५० टक्के शिक्षक नियमित स्वरूपाचे भरावे व भविष्यात पूर्ण शिक्षक व प्राचार्य नियमित करावे. तसेच ज्या महाविद्यालयांना चार वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वर्षे झालीत अशा महाविद्यालयांनी एक शिक्षक नियमित भरावा अशी अट घातली आहे. जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयांनी या अटी पूर्ण केल्या आहेत त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधच्या स्व.रूपचंदभाई प्रेमचंद पुगलिया कला, वाणिज्य महाविद्यालयाचा समावेश आहे. (वार्ताहर)