ठिकठिकाणी पोळा व तान्हा पोळ्याचा उत्साह

By Admin | Updated: September 16, 2015 02:21 IST2015-09-16T02:21:18+5:302015-09-16T02:21:18+5:30

जिल्ह्यात ठिकठिकाणी पोळा व तान्हा पोळा साजरा करण्यात आला. तरूणांनी मारबतची प्रतिकात्मक झाकी काढून दिवसभर आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी नंदी सजावट स्पर्धा घेण्यात आली.

The enthusiasm of poles and tanh | ठिकठिकाणी पोळा व तान्हा पोळ्याचा उत्साह

ठिकठिकाणी पोळा व तान्हा पोळ्याचा उत्साह

गोंदिया : जिल्ह्यात ठिकठिकाणी पोळा व तान्हा पोळा साजरा करण्यात आला. तरूणांनी मारबतची प्रतिकात्मक झाकी काढून दिवसभर आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी नंदी सजावट स्पर्धा घेण्यात आली.
गोवर्धन चौक (छोटा गोंदिया )
गोंदिया : जिल्हा किसान संघटनेच्यावतीने छोटा गोंदिया परिसरातील गोवर्धन चौकात पोळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगर परिषद सदस्य विष्णू नागरीकर यांनी बैलजोडीचे पूजन करून जोडी मालकांना पुरस्कारांचे वितरण केले. तर तान्हा पोळ््याला परिसरातील चिमुकले मोठ्या संख्येत नंदी घेऊन सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी व्हिकसन भगत, लोकेश बुद्धे, योगेश चव्हाण, हुकूमत नागरीकर, अंकीत मटाले, कैलाश वैद्य, सुभाष कडव आदिंनी सहकार्य केले.
काटीनगर परिसर
गोंदिया : येथील शेतकरी गोवर्धन चौकात आपल्या बैलजोड्यांसह जमा झाले होते. त्यानंतर गावातील वरिष्ठ व मान्यवरांनी बैलजोडी व जोडी मालकांना तिलक केले. तर दुसऱ्या दिवशी पिंटू हनवते या तरूणाने मारबत तयार केली. सायकलवर बसवून मारबत गावात फिरविण्यात आली. त्यानंतर गावाबाहेर नेऊन मारबत जाळण्यात आली.
बहु. युवा कल्याण मंडळ, केशोरी
केशोरी : येथील महात्मा गांधी चौकात तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी केशोरी-कनेरी गावात बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
यात चिमुकल्याने आकर्षक वेशभुषा धारण करून सहभाग घेतला होता. तान्हा पोळ््यात ४२५ चिमुकले नंदी घेऊन सहभागी झाले होते. यात उत्कृष्ट नंदी व वेशभुषा धारण केलेल्या प्रथम १० चिमुकल्यांना पुरस्कार देण्यात आले. नंदीचे निरीक्षण सरपंच अश्विनी भालाधरे, उपसरपंच हिरालाल शेंडे, ठाणेदार भस्मे, हरिराम पेशने, जिल्हा परिषद सदस्य तेजुकला गहाणे, बी.एस.मोहतुरे, मंडळ अध्यक्ष विजय मांडवटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश वाकाडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी केले. याप्रसंगी गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
श्री पब्लिक स्कूल येथे तान्हा पोळा
तिरोडा : शाळेत तान्हा पोळा आणि नंदी सजावट स्पर्धा घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका यु.एम. परिहार यांनी नंदीचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली. नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचा वेश परिधान केला होता. नंदी सजावट स्पर्धेचा प्रथम क्रमांक ऐश्वर्या पटले व द्वितीय क्रमांक अथर्व क्षीरसागर यांनी पटकाविला. सर्व विद्यार्थ्यांना परितोषिक परिहार यांनी प्रदान केले.
संचालन संध्या कटरे यांनी केले. कार्यक्रमासाठी संगीता ठवकर, तेजकुमारी बिसेन, पारधी, ठाकरे, गरिया मिश्रा, भारती दखणे, लिना रहांगडाले, भालाधरे, बावणकर, भावना रोकडे, भाग्यश्री करिमोरे व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बोरकन्हार येथे चावडी वाचन
बोरकन्हार : महसूल विभाग महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत येथे चावडी वाचन व गाव भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ अधिकारी एम.आर. केंद्रे, सरपंच ज्योती शहारे, उपसरपंच बिसेन, पोलीस पाटील तिलकचंद कटरे, ग्रामपंचायत सदस्य सदाशीव कटरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तलाठी बोबडे यांनी सात/बारा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना इत्यादींच्या लाभार्थ्यांचे नाव सांगून यापैकी मेलेल्या माणसांची नावे कापण्यात आली. तसेच शुक्ला यांनी येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय ११२, अन्न सुरक्षा २०० व एपीएल ९० कार्डधारक असल्याची माहिती दिली. यावेळी मुकेश रामटेके, अनिल शहारे, कृषिमित्र जितेंद्र पटले, रोजगार सेवक तुरकर, रामलाल बागडे, कोतवाल, शेंडे, प्रकाश बोरकर, चंद्रसेन बोपचे, रत्नदिप शिंगाडे इत्यादी गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बिर्सी फाटा, गांगला
बिर्सी फाटा : तान्हा पोळा उत्सव समिती गांगलाच्या वतीने बाजार चौकात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महादेव व पार्वतीमातेच्या फोटोचे पुजन करुन तान्हा पोळ्याला सुरवात करण्यात आली. तान्हा पोळ्यामध्ये जवळपास १५० ते २०० चिमुकले आपले नंदी सजवून व विविध प्रकारचे देखावे तयार करुन सहभागी झाले. यामध्ये काही मुले नंदीसह शेतकऱ्यांची वेषभुषा धारन करुनप सहभागी झाले. कार्यक्रमासाठी तान्हा पोळा समिती व तंटामुक्तीचे सर्व सदस्य व ग्रा.पं. गांगलाचे सर्व सदस्य पदाधिकारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. तान्हा पोळ्यामध्ये निरिक्षन करुन १ ते १५ पर्यंत बक्षीस ठेवण्यात आले होते. या प्रथम क्रमांक सार्थक लोहिया, द्वितीय क्र. समर्थ पाल्हेवार, तृतीय क्रमांक साहिल ठवकर यांनी पटकाविला व त्यांना आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
शारदा कॉन्वेंट
गोंदिया : शाळेत विद्यार्थ्यांना रांगेत आपापल्या नंदी बैलांना घेवून उभे करण्यात आले. शाळा संचालिका योगिता बिसेन व प्राचार्या उषा रहांगडाले यांनी नंदीपुजा करुन विद्यार्थ्यांना टिळक लावले. चिमुकल्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. नंदीबैल सजावट कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बिसेन यांनी गोड पदार्थाचे वितरण केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शबाना सेया, शहारुनिसा पठान, वैशाली कुथे, भारती नेवारे, निशा भुनेश्वर इ. शिक्षिकांनी सहकार्य केले.
गोंदिया पब्लिक स्कूल
गोंदिया : शाळेत पुर्व प्राथमिक विभाग ब्लुमिंग बड्स चिमुकल्यांच्या हातात सजविलेल्या बैलांच्या जोड्या होत्या. शाळा प्रबंधक प्रा. प्रफुल वस्तानी आणि शाळा प्राचार्य रीता अग्रवाल यांनी आरती करुन मुलांना हा सण साजरा करण्याचे कारण सांगितले. डी.बी. एम. एज्युकेशन, सोसायटीचे अध्यक्ष अर्जुन बद्धे, अमित बुद्धे संस्था सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी या सणाचे महत्व सांगून चिमुकल्यांचे कौतुक करुन त्यांना बोजारा दिला.
मारबत मिरवणूक व तान्हा पोळा थाटात
देवरी : पोळाच्या दिवशी येथील धुकेश्वरी माता मंदीर ट्रस्अच्या वतीने पोळ्याचे आयोजन येथील जि.प. हायस्कूलच्या पटागंणावर करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी ठाणेदार राजेंद्र तिवारी होते. याप्रसंगी मंदीराचे पुजारी सुरेंद्र मिश्रा, तानबा निर्वाण, शंकरलाल अग्रवाल, संपत अग्रवाल, गोविंद अग्रवाल, उद्योगपदी सुरपितसिंग टुटेज पं. रामकिशोर तिवारी, मनोहर उदापुरे, टी.आर. राणे, अ‍ॅड. भुषण मस्के, अ‍ॅड. श्रावण उके यांच्या सह देवरी गावातील गणमान्य नागरिक आपल्या वैलांच्या जोडीसह उपस्थित होते. यावेळी आकर्षक १० बैलांच्या जोड्याना पाहुण्यांकडून रोख पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक धुकेश्वरी मंदीर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांनी मांडले. संचालन बाबुराव श्रीसागर यांनी करुन आभार मानले. या कार्यक्रमासाठी सचिव सुशिल शेंद्र, सहसचिव आनंदराव नळपते, राजकुमार शाहू, प्रेमकुमार रिनाईत, मधू शेंद्रे यांच्यासह मंदीर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे पोळ्याच्या पाडव्याला सकाळी ८ वाजता येथील पंचशिल चौकातून मारबतची मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणुक गावातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत येथील केशोरी तलाव परिसरात दहन करण्यात आले.
दुपारी ३ वाजता धुकेश्वरी मंदीरात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात लहान मुलांनी आपआपली नंदी उत्कृष्टपणे सजवून आपले होते. या ठिकाणी उत्कृष्ट नंदी बैलांना पुरस्कृत करण्यात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक बालकास प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आले.

Web Title: The enthusiasm of poles and tanh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.