राष्ट्रवादीचे प्रशासनाला साकडे
By Admin | Updated: July 17, 2015 01:16 IST2015-07-17T01:16:12+5:302015-07-17T01:16:12+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना निवेदन पाठविले.

राष्ट्रवादीचे प्रशासनाला साकडे
सालेकसा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना निवेदन पाठविले.
या निवेदनानुसार, धानाची आधारभूत किमत वाढविण्यात यावी, सन २०१४ च्या खरीप हंगामातील सरकारी, आदिवासी धान खरेदी केंद्रात विक्री केलेल्या धानाची प्रलंबित रक्कम देण्यात यावी, सन २०१५ च्या रबी हंगामात विक्री केलेल्या धानाची रक्कम देण्यात यावी, शासनाने धानाला प्रतिक्विंटल २५० रूपये घोषित केलेले बोनस वितरित करण्यात यावे, सालेकसा तालुक्यात जून २०१५ मध्ये आलेल्या वादळात क्षतिग्रस्त घरांचा मदतनिधी त्वरित देण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांची पूर्तता आठ दिवसांत न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राकाँ ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, दुर्गा तिराले, राजकुमारी विश्वकर्मा, लक्ष्मण नागपुरे, तुकाराम बोहरे, मनोज विश्वकर्मा, साखरे, घनश्याम कटरे, अभिषेक चुटे, योगराज हरिणखेडे, दौलत अग्रवाल, संतोष रहांगडाले, निकेश गावड, ओमप्रकाश नागपुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)