रूग्णांच्या ओळखीसाठी क्षेत्र सर्वेक्षणावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:15+5:30
वेळीच रूग्णांचा शोध घेणे हा कोविड परिस्थिती हाताळण्यावरचा उत्तम उपाय आहे. जितक्या लवकर रूग्णांची ओळख पटेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे सर्वेक्षणांमधून रूग्णांची ओळख पटविणे यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी दिले.

रूग्णांच्या ओळखीसाठी क्षेत्र सर्वेक्षणावर भर द्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वेळीच रूग्णांचा शोध घेणे हा कोविड परिस्थिती हाताळण्यावरचा उत्तम उपाय आहे. जितक्या लवकर रूग्णांची ओळख पटेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे सर्वेक्षणांमधून रूग्णांची ओळख पटविणे यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी दिले.
कोरोना रूग्णांचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढती रु ग्ण संख्या या परिस्थितीचा आढावा व त्यावर प्रभावीपणे मात करण्याच्या अनुषंगाने बुधवारी (दि.२६) तिरोडा येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, तिरोडा उपविभागीय अधिकारी राहुल खांदेभराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत तालुका नोडल अधिकाऱ्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये नियमतिपणे भेटी देऊन रूग्णांशी संवाद साधून येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण करण्याची कामे तात्काळ करावी असे निर्देश देण्यात आले. सदर बैठकीत खाजगी व शासकीय फिव्हर क्लिनिकमध्ये येणाऱ्या सर्व रु ग्णांची माहिती व लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करणे बाबत सूचना देण्यात आल्या. कोविड-१९ संदर्भात जास्तीतजास्त जनजागृती करून शहरी भागात तपासणी केंद्र (टेस्टिंग सेंटर) वाढविण्याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
सभेत आयएलआय सर्वे, क्रीयाशील सर्वेक्षण, संशियतांचे नमुने घेणे, संपर्क शोधणे, फिव्हर क्लिनिक, गृह अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, कोविड केअर सेंटर, रूग्णांना घेऊन जाण्याकरिता रूग्णवाहिकेची सुविधा, साधनांची उपलब्धता, कोरोना बाधित रूग्णांचे सर्वे आदी बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच तिरोडा तालुक्यात करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच आयएलआय रुग्ण सर्वेक्षणाचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळेस आयएलआय सर्वेबाबत चर्चा करून कंटेन्मेंट झोन मधील ५० वर्षावरील तसेच कायमस्वरुपी आजार असणाºया नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्याची सूचना देण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांची उच्च जोखीम (हाई रिस्क), निम्न जोखीम (लो रिस्क) आदींची संपर्क तपासणी (कॉन्ट्रेट ट्रेकिंग) करणे, कोणतेही लक्षण नसलेल्या रूग्णांना गृह विलगीकरणात ठेवणे व नियमित उपचार तथा भेट देणे याबाबतच्या प्रक्रियांसंदर्भात चर्चा करण्यात आली. सभेला तहसीलदार प्रशांत घोरूडे, गट विकास अधिकारी लिल्हारे, डॉ प्रशांत तुरकर, डॉ. पांचाळ, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, तिरोडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश मोटघरे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच तिरोडा तालुक्यातील आरोग्य विभागाचे व तिरोडा नगर पालिकेचे सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते.