शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

घरी आईचं पार्थिव अन् १७ वर्षाच्या शालिनीने दिला बारावीचा पेपर; शिक्षणासाठीच्या जिद्दीला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 00:15 IST

आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ८ किलोमीटर अंतर पार करून पोहोचली परीक्षा केंद्रात

दिलीप चव्हाण, गोरेगाव (गोंदिया): घरात आक्रोश, शोककळा पसरलेली, मनात आईच्या आठवणींचा असह्य वेदनादायी पूर... अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगातही एका १७ वर्षीय मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द पाहून संपूर्ण परिसर स्तब्ध झाला. तिने चक्क आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळेवर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर दिला. मनाला चटका लावणाऱ्या प्रसंगातही मुलीने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द प्रेरणादायी आहे. गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील शालिनी छन्नुलाल पोंगळे असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

शालिनी पोंगळे ही गोरेगाव शहरातील पी. डी. रहांगडाले विद्यालयातील बारावीची कला शाखेची विद्यार्थिनी. मंगळवारी (दि. २४) शालिनीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. पण पेपरच्या आदल्या दिवशीच साेमवारी (दि. २३) रात्री ८ वाजता शालिनीची आई बबिता पोंगळे यांचा गोंदियातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे शालिनीसह पोंगळे कुटुंबावर शोककळा पसरली. कुटुंबात राहणाऱ्या तिघीच आजी, आई आणि शालिनी. आधीच घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि त्यात आईचा ३८व्या वर्षी मृत्यूने शालिनीवर मोठे संकट कोसळले. या सर्व दुःखद घटनेची माहिती शालिनीने पी.डी. रहांगडाले विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरघडे व वर्गशिक्षक डी. एम. राठोड यांना दूरध्वनीवरून दिली. आईचे अंत्यसंस्कार करायचे आहेत, मी आज पेपर देऊ शकत नाही. शालिनीचे हे शब्द ऐकताच प्राचार्य सी. डी. मोरघडे यांनी आपल्या शिक्षकासह शालिनीचे घर गाठले. तिची समजूत काढली व शालिनीला पेपर देण्यासाठी स्वतः परीक्षा केंद्रावर घेऊन आले. दीड तासाच्या आत पेपर सोडवून झाल्यावर शालिनीला पुन्हा शिक्षकांनी तिच्या घरी सोडून दिले.

आठ किमी अंतर पार करीत पोहोचली शालिनी परीक्षा केंद्रावर

गोरेगाव ते तुमखेडा आठ किमीचा प्रवास करीत शालिनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यात अश्रू होते; पण मनात आईची प्रेरणा. तिने अर्थशास्त्राचा पेपर शांतपणे सोडविला. तिच्यासाठी हा केवळ एक विषय नव्हता, तर आयुष्याच्या कठीण प्रसंगावर मात करण्याची पहिली पायरी होती. शालिनीची ही जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. दुःख कितीही मोठं असलं, तरी स्वप्न आणि शिक्षणाची ज्योत विझू देत नाही याचे जिवंत उदाहरण शालिनीने दिले.

परीक्षा केंद्रावर भावनिक वातावरण

शालिनी पोंगळे ही बारावीची विद्यार्थिनी पी. डी. रंहागडाले विद्यालयातील परीक्षा केंद्रावर वर्गशिक्षक डी.एम. राठोड यांच्यासोबत पोहोचली. प्राचार्य सी. डी. मोरघडे व बारावी परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक डी.बी. चाटे यांनी तिला धीर दिला. डोळ्यात सतत अश्रू असतानाही शालिनीने ध्येयाने अर्थशास्त्राचा पेपर सोडविला. यावेळी परीक्षा केंद्रावर भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

अंत्यसंस्कारासाठी शालिनीला आर्थिक मदत

२३ फेब्रुवारीला सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास शालिनीची आई बबिता पोंगळे हिचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी पी.डी. रंहागडाले विद्यालय गाठून शालिनीला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली, तर प्राचार्य सी. डी. मोरघडे यांनी शाळेकडून शालिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करीत शालिनीला धीर दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bereaved daughter takes exam, honoring mother's dream with courage.

Web Summary : Despite her mother's death, 17-year-old Shalini showed incredible resolve by taking her economics exam. Overcoming grief and poverty, she fulfilled her mother's dream, inspiring many with her dedication to education. Support poured in from her school and community.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थीexamपरीक्षाDeathमृत्यू