निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:25+5:30
आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्याला लागून गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. जिल्ह्यातील आमगांव आणि अर्जुनी मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे.

निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सामान्य निवडणूक निरीक्षक आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, सामान्य निवडणूक निरीक्षक मंजूर अली (अर्जुनी/मोरगाव), राजीव मेहता (तिरोडा), शौकत अहमद प्यारे (गोंदिया), धनंजयसिंग भदोरीया (आमगाव), पोलीस निवडणूक निरीक्षक धर्मवीर (अर्जुनी मोरगाव), सुधीरकुमार पोरीका (तिरोडा), जी.जी.पांडे (गोंदिया), टी. ईक्का (आमगाव), जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते.
आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्याला लागून गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. जिल्ह्यातील आमगांव आणि अर्जुनी मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे. या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ या दरम्यानची आहे. गोंदिया आणि तिरोडा या मतदारसंघातील मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते सायंकाळी ६ या दरम्यान आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्र म राबविण्यात येत आहे.
१८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यात येत असल्याचे सांगितले.डॉ. बलकवडे या वेळी म्हणाल्या,मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात १०३ ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनीट वापरण्यात येत आहे. मतदान केंद्राची माहिती मतदान केंद्रावर असलेल्या सुविधा, निवडणूक प्रक्रियेसाठी असलेले मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, सीव्हीजीलवर प्राप्त तक्र ारी आणि चारही विधानसभा मतदारसंघात १० लाख ९६ हजार ४४१ मतदार आपला मतदानाचा हक्क १२८२ मतदान केंद्रावरुन बजावणार असल्याचे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी,स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, खर्च विषयक बाबीचे नोडल अधिकारी विकास राऊळकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव, उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तांबे, सीव्हीजीलच्या नोडल अधिकारी प्रणती बुलकुंडे उपस्थित होते.
टोल फ्री क्रमांकावरील तक्रारींची घेतली माहिती
मागील निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे. त्या ठिकाणी मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्र म राबवावे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यास मदत होईल.ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे,त्याची कारणे शोधून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी पुढाकार घ्यावा. उमेदवाराच्या प्रत्येक बातमीवर लक्ष असावे. ते प्रचारासाठी वापरणार असलेल्या ध्वनीचित्रफित, बल्क एसएमएस, जाहिराती याबाबतची पूर्व परवानगी घेऊनच त्यांचे प्रसारण करावे असे सांगितले.१९५० तक्र ार नंबरवर प्राप्त तक्र ारीची माहिती घेतली.मोबाईल कवरेज एरीया जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रात नाही याबाबतची माहिती निवडणूक निरीक्षकांनी घेतली.