आठ सहकारी संस्थांची होणार निवडणूक
By Admin | Updated: February 7, 2015 23:26 IST2015-02-07T23:26:29+5:302015-02-07T23:26:29+5:30
गेल्या ३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक

आठ सहकारी संस्थांची होणार निवडणूक
गोंदिया : गेल्या ३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणद्वारे ही निवडणूक घेतली जाणार असून या प्राधीकरणाकडून घेतली जात असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच निवडणूक राहणार आहे. लवकरच या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषीत केला जाणार आहे.
१९९७ च्या घटना दुरूस्तीनुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका प्राधीकरणच्या माध्यमातूनच घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील त्यांची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. प्राधीकरणने यासाठी काही नियम तयार केले असून संस्थांची अ, ब, क व ड या चार प्रकारात विभागणी केली आहे. याती अ गटात- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ब गटात- नागरी बँक, १० लाखांपेक्षा जास्त भाग भांडवल असणाऱ्या सेवा सहकारी संस्था (२८), कर्मचारी, नागरी व ग्रामीण पत संस्था व इतर काही (१६) असा एकूण ५६ आहेत. क गटात- १० लाखांपेक्षा कमी भाग भांडवल असलेल्या सेवा सहकारी संस्था (१२०), लहान पत संस्था (६४), प्राथमिक दुग्ध, मत्स्य, पशुधन सहकारी संस्था (५८) व इतर काही संस्थांचा समावेश असून एकूण २९५ संस्था आहेत. तर ड गटात- २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण व उपसा, जलसिंचन व पाणी वापर संस्था (२८), मजूर (४२), जंगल कामगार (४) अशा एकूण ७८ संस्था आहेत.
जिल्हा उप निबंधक कार्यलयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणच्या आदेशानुसार ३१ आॅक्टोबर २०१४ पूर्वी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ निवडणुकीस पात्र ठरत असून त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात घेण्यात येणार आहेत. या आठ संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली असून लवकरच त्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषीत केला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)