वीज वितरण कंपनीला आठ हजारांचा दंड

By Admin | Updated: June 2, 2014 01:23 IST2014-06-02T01:23:11+5:302014-06-02T01:23:11+5:30

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा आरोप लाऊन

Eight thousand penalty for power distribution company | वीज वितरण कंपनीला आठ हजारांचा दंड

वीज वितरण कंपनीला आठ हजारांचा दंड

गोंदिया : वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा आरोप लाऊन ग्राहकाकडून २५ हजार २११ रूपये तसेच वीज जोडणीच्या नावावर चार हजार रूपये उकळणार्‍या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात ग्राहक न्याय मंचने वीज वितरण कंपनीला तक्रारदारास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी पाच हजार रूपये तर तक्रारीवर आलेल्या खर्चापोटी तीन हजार रूपये दंड ठोठावला आहे. २९ मे रोजी ग्राहक न्यायमंचने हा आदेश सुनावला आहे.

सविस्तर प्रकरण असे की, तक्रारकर्ता दिलीप काशिनाथ तिवारी (तिरोडा) यांच्याकडे त्यांच्या नावाने सन २00५ वीज मीटर आहे. त्यांच्याक डील विद्युत देयक अवाढव्य येत असल्याने तिवारी यांनी वीज मीटर मध्ये बीघाड आल्याने मीटर बदलून देण्याची विनंती वीज कंपनीकडे केली होती.

यावर २१ मे २0११ रोजी तिवारी यांच्या तक्रारीवरून वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्याकडील मीटर तपासणी करून त्याचे सील तुटलेले असल्याचे तसेच मीटर कमी गतीने फिरत असल्याचे दाखवून तिवारी यांना २५ हजार २११ रूपये २६ पैशांचे विद्युत देयक दिले. एवढेच नव्हे तर वीज जोडणीच्या नावावर चार हजार रूपये घेतले.

मात्र यानंतरही तिवारी यांना १४९ युनिटचे बिल दिल्या जात असल्याने त्यांनी जास्तीचे पैसे वसुल केले जात असून कंपनीकडे जमा असलेल्या रकमेतून पुढील देयक अदा करण्यात यावे.

तसेच झालेल्या त्रासापोटी वीज कंपनीकडून १२ हजार रूपये मिळावे यासाठी तिवारी यांनी १६ नोव्हेंबर २0११ रोजी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व्ही.डी.मेश्राम व सहायक अभियंता ए.व्ही. तुपकर यांच्या विरोधात ग्राहक तक्रार न्याय मंचकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे न्यायालयाने दोघांना नोटीस बजावून त्यांचा लेखी जबाब मागविला.

यावर त्यांच्या वकिलांनी दोघांना जाब मांडत तक्रारदार तिवारी हे वेळोवेळी विद्युत देयक भरत नव्हते. तसेच त्यांच्या मीटरची तपासणी केली असता ते कमी वेगाने फिरत असल्याचे, मीटरची सील तुटलेली असल्याने व त्यांनी वीज जोडणी साठी आकारण्यात येणारी रक्कम न भरल्याचे आपल्या जबाबात नमूद केले.

यावर मात्र तिवारी यांच्या वकिलांनी मीटरचे सील तुटले नाही. तसेच पंचनामा सहायक कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत तयार करावयाचा होता व त्यावेळी ग्राहक तेथे उपस्थित होणे गरजेचे होते. मात्र सहायक कार्यकारी अभियंता यांनी स्वत: पाहणी न केल्याने हा पंचनामा वैध ठरू शकत नसल्याची युक्तीवाद मांडला.

तसेच वीज कंपनीने पंचनामा करीत असताना दशर्विलेल्या पंचांचे प्रतिज्ञापत्र पुरावा म्हणून कंपनीने दाखल केले नसल्याचेही कारण पुढे मांडत २५ हजार २११ रूपयांचे देयक बेकायदेशीर असल्याचे मत मांडले. यावर ग्राहक तक्रार न्याय मंचने वीज कं पनीला तिवारी यांच्याकडून वसूल केलेली २५ हजार २११ रूपयांची रकम त्यांच्या पुढील देयकांत समायोजीत करावी, उपरोक्त रकमेवर दसादशे आठ टक्के दराने व्याज द्यावे, वीज जोडणीसाठी घेतलेले चार हजार रूपये परत करावे, तिवारी यांना झालेल्या त्रासाबद्दल पाच हजार रूपये तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये देण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३0 दिवसांच्या आत करण्याचे आदेशात नमूद आहे.

(शहर प्रतिनिधी)

Web Title: Eight thousand penalty for power distribution company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.