विशेष पथकाने पकडली आठ हजारांची दारू
By Admin | Updated: January 25, 2015 23:17 IST2015-01-25T23:17:55+5:302015-01-25T23:17:55+5:30
विशेष पथकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तांडा येथे धाड घालून दारू संबंधात घरझडती घेतली. यात दोन आरोपींकडे एकूण ८ हजार ४६० रूपयांची देशी व इंग्रजी

विशेष पथकाने पकडली आठ हजारांची दारू
गोंदिया : विशेष पथकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तांडा येथे धाड घालून दारू संबंधात घरझडती घेतली. यात दोन आरोपींकडे एकूण ८ हजार ४६० रूपयांची देशी व इंग्रजी दारू अवैधरित्या साठवून ठेवलेली आढळली.
तांडा येथील रहिवासी संतोष भरत पटेरिया (३७) याने आपल्या जनरल स्टोर्स दुकानात एका प्लास्टिकच्या पिशवीत ४८ देशी दारूचे पव्वे व ३८ चिता नामक देशी दारूचे पव्वे अशी एकूण चार हजार ३०० रूपयांची दारू अवैधरित्या साठवून ठेवली होती. विशेष पथकाचे पोलीस हवालदार कवलपालसिंह भाटिया यांनी धाड घालून सदर दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली. पोलीस हवालदार भाटिया यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला. तपास पोलीस हवालदार तिवारी करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत विशेष पथकाचे पोलीस हवालदार टेंभुर्णे यांनी तांडा येथील एका पानठेल्याची दारू संबंधात झडती घेतली. पानठेल्यात त्यांना चार हजार १६० रूपये किंमतीचे देशी व इंग्रजी दारूचे एकूण ८० पव्वे अवैधरित्या साठविलेले आढळले. ही कारवाई शनिवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजता करण्यात आली. प्रवीण यशवंत डोंगरे (२२) व उत्तम मोहन खांडेकर (४२) दोन्ही रा. तांडा अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी उत्तम खांडेकर फरार आहे. पोलीस हवालदार टेंभुर्णे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला. तपास पोलीस हवालदार आडे करीत आहेत. (प्रतिनिधी)