शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम करा

By Admin | Updated: April 8, 2016 01:39 IST2016-04-08T01:39:45+5:302016-04-08T01:39:45+5:30

राज्य व केंद्र शासनाने जनसामान्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

Effort to reach government schemes to the masses | शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम करा

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम करा

राकेश शर्मा : भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहन
सालेकसा : राज्य व केंद्र शासनाने जनसामान्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसून योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. असे झाल्यास जनतेचा व कार्यकर्त्यांचा दोघांचा हित होईल. शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश शर्मा यांनी केले.
रविवारी (दि.३) भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष परसराम फुंडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराम वडगाये, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, बाबा लिल्हारे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी आघाडीचे महामंत्री शंकर मडावी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष इसराम बहेकार, मेहतर दमाहे, बाबुलाल उपराडे, पं.स.सदस्य जय डोये, प्रमिला दसरिया, संगीता शहारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. संचालन महामंत्री राजेंद्र बडोले यांनी केले. कार्यक्रमासाठी त्रिभुवन दमाहे, सुनील अग्रवाल, गणेश फरकुंडे, रमशुख चुटे, बबलू मच्छिरके, अजय वशिष्ट, यादव नागपुरे, सविता वट्टी, रामशुक्ल चुटे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Effort to reach government schemes to the masses