परस बागेतून घेतात ५० हजारांचे उत्पन्न ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST2021-07-28T04:30:07+5:302021-07-28T04:30:07+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून येथील महानंदा शेंडे या आदिवासी वस्तीत घराच्या मागे असलेल्या पडीक निकामी १५ गुंठे जागेवर भाजीपाला लागवड ...

Earns Rs 50,000 from backyard garden () | परस बागेतून घेतात ५० हजारांचे उत्पन्न ()

परस बागेतून घेतात ५० हजारांचे उत्पन्न ()

गेल्या अनेक वर्षांपासून येथील महानंदा शेंडे या आदिवासी वस्तीत घराच्या मागे असलेल्या पडीक निकामी १५ गुंठे जागेवर भाजीपाला लागवड करून स्वतःच्या घरची भाजीपाल्याची गरज भागवत होत्या. शिल्लक उत्पादन झालेला भाजीपाला शेजारी असलेल्या बाम्हणी या गावात विकण्याचा त्यांचा नित्यनेम होता. अशात कृषी सहायक राजशेखर राणे यांनी १५ गुंठे जागेत आधुनिक पद्धतीने ठिबक व प्लास्टिक मल्चिंगवर भाजीपाला लावण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्व साहित्य उपलब्ध करून जोडणी सुद्धा करून दिली. त्यावर महानंदाबाई यांनी च‌वळी, वाल व वांगीची लागवड केली. आतापर्यंत चिल्लर भाजीपाला विक्रीतून त्यांनी सुमारे २० हजार रुपये कमावले आहे. तसेच चालू उत्पादनातून किमान ५० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. कृषी सहायक राणे यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले व सर्व शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संपर्कात रहावे असे महानंदाबाई सांगतात.

Web Title: Earns Rs 50,000 from backyard garden ()