जिल्ह्यातील शासकीय गौण खनिपट्ट्याचा ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:14+5:302021-09-11T04:29:14+5:30

या लिलावांतर्गत १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येईल. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ...

E-auction of government secondary mining leases in the district | जिल्ह्यातील शासकीय गौण खनिपट्ट्याचा ई-लिलाव

जिल्ह्यातील शासकीय गौण खनिपट्ट्याचा ई-लिलाव

या लिलावांतर्गत १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येईल. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन नोंदणी बंद होईल व २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यपासून ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने जमा करणे सुरू होईल. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ई-निविदा ऑनलाईन पद्धत बंद होईल आणि २८ व २९ सप्टेंबर रोजी प्रत्येकी खाणपट्ट्याच्या ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ई-निविदा उघडण्यात येतील.

ई-निविदा व ई-लिलावाबाबत प्रशिक्षण १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक कंत्राटदारांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढवे यांनी कळविले आहे.

Web Title: E-auction of government secondary mining leases in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.