During the election period, 13 lakh 79 thousand were seized | निवडणुकीच्या काळात जप्त केले १३ लाख ७९ हजार

निवडणुकीच्या काळात जप्त केले १३ लाख ७९ हजार

ठळक मुद्दे२७९ ठिकाणी टाकली धाड : ४४ लाखांची दारू व मुद्देमाल जप्त,पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या काळात गोंदिया जिल्ह्यात १३ लाख ७९ हजार ५३० रूपये रोख जप्त करण्यात आले. निवडणुका निर्भयपणे व मोकळ्या वातावरणात व्हाव्यात यासाठी गोंदिया पोलिसांमार्फत १४ ठिकाणी आंतरराज्यीय व आंतरजिल्हा सीमेवर तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
प्रत्येक मतदार संघात एसएसटी व एफएसटी कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी २७९ ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर धाड घालून गुन्हे दाखल केले.
त्या आरोपींकडून ४४ लाख ४१ हजार ४३७ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या नऊ जणांना तडीपार करण्यात आले. शांतता भंग करणाऱ्या ६६५ लोकांवर फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली.
५१३ इसमांकडून चांगल्या वर्तवणुकीचे इंटेरियम बॉन्ड व ६२ लोकांकडून अंतीम बॉन्ड घेण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत ८९ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सी-व्हीजील अ‍ॅप कार्यान्वीत करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींकरीता हेल्पलाईन १९५० वर कार्यान्वीत करण्यात आली आहे.

Web Title: During the election period, 13 lakh 79 thousand were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.