शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

रेती वाहक ट्रकमुळे डोळ्याचे आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:06 AM

तालुक्यात रेती घाटावरुन रेती उचल करुन ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जात असताना पुरेशी काळजी घेतल्या जात नाही. रेती ट्रकमध्ये पूर्णपणे भरली जाते.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : रेतीची वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन

आॅनलाईन लोकमततिरोडा : तालुक्यात रेती घाटावरुन रेती उचल करुन ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जात असताना पुरेशी काळजी घेतल्या जात नाही. रेती ट्रकमध्ये पूर्णपणे भरली जाते. आवश्यकतेपेक्षा जास्त रेती भरल्याने व त्यावर काहीही झाकले जात नसल्याने दुचाकी स्वार आणि रस्त्यावरुन ये-जा करणाºयांच्या डोळ्यात जाते. डोळ्याच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कित्येकदा यामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पोलीस विभागही याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.ट्रकमध्ये रेती उंच भागापर्यंत भरली जाते. सोमवारी (दि.२६) सुलताना नाव असलेला एक विना क्रमाकांचा ट्रक तिरोड्याकडून साकोली मार्गे जात होता. यात देखील ट्रालीच्या वरील भागापर्यंत रेती भरुन वाहतुक केली जात होती. तर लाखेगाव , बोपेसर, सातोना, वडेगाव या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक करणाºया ट्रकची वर्दळ असते. यापैकी बºयाच ट्रकवर क्रमांक सुध्दा नसतात. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास तक्रार कशी करायची असा सुध्दा प्रश्न निर्माण होतो. हा सर्व गंभीर प्रकार सर्रासपणे सुरू असून महसूल आणि पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.