पावसाची हुलकावणी, पेरणीवर परिणाम

By Admin | Updated: June 28, 2014 01:11 IST2014-06-28T01:11:44+5:302014-06-28T01:11:44+5:30

साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १७०० ते २००० मि.मी. पावसाची सरासरी असते.

Due to rain deficiency, the result of sowing | पावसाची हुलकावणी, पेरणीवर परिणाम

पावसाची हुलकावणी, पेरणीवर परिणाम

सालेकसा : साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १७०० ते २००० मि.मी. पावसाची सरासरी असते. परंतु यंदा ही सरासरी ८०० ते १००० मि.मी.पर्यंत अडकून राहिली. पावसाने दडी मारल्याने आतापर्यंत निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात करण्यात आलेली पेरणी फक्त ६० टक्के बियाणे अंकुरीत झाले आहे.
४० टक्के बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे किंवा उशिरा अंकुरीत होण्याची शक्यता आहे. अथवा अत्याधिक पावसाचा फटका बसल्यास सडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा मृग नक्षत्रात पावसाचे वाहन हत्ती होते. परंतु हत्याने अल्पश: प्रमाणात पाऊस पाठविले त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. पेरणी केल्यावर मात्र आवश्यक असलेला पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकलेल्यापैकी आत दबलेले बियाणे अंकुरीत झाले.परंतु वर असलेले बियाणे तसेच पडून राहीले. पावसाअभावी ते निकामी झाले व मोठ्या प्रमाणात पक्ष्याचे आहार बनले. आता आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. या नक्षत्रतात पावसाची दमदार हजेरी असते. परंतु पाच दिवस लोटून ही पावसाची हुलकावणी कायम आहे. यंदा आर्द्रा नक्षत्रात पावसाचे वाहन मोर आहे. परंतु आतापर्यंत मोराने दमदार पावसाचे आवाहन करीत आनंदीत होण्याचा काम केला नाही, असे दिसत आहे. आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस उर्वरीत पेरणीचे काम पूर्ण करण्यात मदत करतो. त्याच बरोबर जमिनीची नागरणी करून तीचे मशात करणे व रोवणीसाठी सज्ज करण्यात मदत मिळते. परंतु आतापर्यंत दमदार पाऊस न पडल्याने शेतीचे सर्वच को रखडण्याच्या मार्गावर आहेत. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी ठरत असल्याचे दिसत असून शेतकरी वर्गासह कृषी विभाग व शासनाचे इतर घटकसुध्दा चिंतेत सापडले आहेत. पुढील आवाहनाना कसे सामोर जावे याचे आत्ममंथन करण्यात लागले आहेत. शासनाने किती ही पर्यायी उपाययोजना आखल्यातरी दुष्काळाची भरपाई कधीच पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनीसुध्दा सावध पवित्रा घेत शेतीत आपला भांडवल लावणे गरजेचे आहे.
जेणेकरून पुढे होणारा नुकसान कमी होऊ शकतो. शेवटी निसर्ग रुसला आणि शेतकरी फसला असेच सिध्द होते. भारताची शेती ही मान्सूनवर अवलंबीत असते. मान्सून वेळेवर व योग्य प्रमाणात आला तर शेतीला लाभ होतो अन्यथा सर्वप्रकारे नुकसानच नुकसान म्हणून भारतात शेतीला मोठा जुगाराचा खेळ मानतात. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण १२५ ते १५० मि.मी. असल्याने येथील शेतकरी सर्वत्र भात पिकाची लागवड करीत असतात. (प्रतिनिधी)

Web Title: Due to rain deficiency, the result of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.