पावसामुळे ईदच्या उत्साहावर विरजन

By Admin | Updated: July 19, 2015 01:33 IST2015-07-19T01:33:42+5:302015-07-19T01:33:42+5:30

ऐन रमजान ईदच्या दिवशी सकाळपासूनच बरसलेल्या दमदार पावसामुळे मुस्लीम बांधवांच्या उत्साहावर विरजन पडले.

Due to the rain caused by the rain, | पावसामुळे ईदच्या उत्साहावर विरजन

पावसामुळे ईदच्या उत्साहावर विरजन

ईदगाहतील नमाज रद्द : शेतकरी मात्र सुखावला
गोंदिया : ऐन रमजान ईदच्या दिवशी सकाळपासूनच बरसलेल्या दमदार पावसामुळे मुस्लीम बांधवांच्या उत्साहावर विरजन पडले. पावसामुळे ईदगाह येथे होणारी नमाज रद्द करण्यात आली. मात्र या पावसामुळे उकाड्यापासून सुटका मिळाली असतानाच आकाशाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी मात्र सुखावला. पाऊस बरसल्यामुळे शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला लागला.
मुस्लीम धर्मीयांचा सर्वात पवीत्र व महत्वाच सण म्हणून रमजान ईद गनली जाते. मागील महिन्याभरापासून मुस्लीम बांधव रोजे ठेवतात व रमजान ईद साजरी करून आपला आनंद व्यक्त करतात. साक्षात अल्लाहचा महिनाच म्हणून रमजान चा म्हटला जातो. त्यामुळे रमजान ईदसाठी मुस्लीम बांधवांकडून जोमात तयारी सुरू होती. शुक्रवारी (दि.१७) शहरातील बाजारपेठेत मुस्लीम बांधवांची खरेदीसाठी एकच गर्दी दिसून येत होती. तर शेवयांच्या दुकानांतही मुस्लीम बांधव शेवई खरेदी करताना दिसून येत होते.
शनिवारी (दि.१८) रमजान ईदची नमाज येथील ईदगाहवर होणार होती. मात्र सकाळपासूनच पाऊस बरसल्यामुळे ईदगाहवर होणारी नमाज रद्द करण्यात आली. त्यामुळे मस्जीद मध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. मात्र पाऊस असल्याने त्यांच्या उत्साहावर पडल्याचे दिसून आले. पावसामुळे सर्वांनीच आपापल्या घरात राहूनच ईदचा सण साजरा करण्यावर भर दिला. (शहर प्रतिनिधी)
बळीराजा उतरला शेतात
पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे खोळंबून पडली होती. जिल्ह्यात कित्येक भागांत अद्यापही रोवण्या झालेल्या नाहीत. पाऊस नसल्यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. कधी-कधी पाऊस बरसतो व शेतीच्या कामाला लागतो असा तयारीत बळीराजा दिवस मोजत होता. त्यात शनिवारी सकाळपासून हजेरी लावलेल्या पावसाने बळीराजा सुखावला व त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पाऊस बरसल्याने बळीराजा पुन्हा शेतात उतरला असून शेतीच्या कामांत व्यस्त झाला.

Web Title: Due to the rain caused by the rain,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.