शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्रतेमुळे धानाची पडक्या दरात खरेदी

By admin | Updated: November 16, 2014 22:52 IST

येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात धानाची खरेदी सुरू शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे लोकमतने बातमीतून उजेडात आणले होते. विशेष म्हणजे बाजार

गोंदिया : येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात धानाची खरेदी सुरू शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे लोकमतने बातमीतून उजेडात आणले होते. विशेष म्हणजे बाजार समितीत येणाऱ्या धानात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने धानाला आधारभूत किंमत मिळत नसल्याचे बाजार समिती प्रशासनाने कबूल केले आहे. मात्र धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला धान बाजार समितीत व्यापाऱ्यांना विकावा लागत असून त्यांची पिळवणूक सुरूच असल्याचे दिसते. येथील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १५३ गावे येत असून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने येथील शेतकरी आपला धान बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. १ आॅक्टोबरपासून बाजार समितीने धान खरेदी सुरू केली असून यात मध्ये मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची आवक असल्याचे समितीकडूनच कळले आहे. हलक्या धानात आयआर व १०१० या दोन प्रतींच्या धानाची सर्वाधीक आवक आहे. यंदा हलक्या धानाला एक हजार ३६० रूपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बाजार समितीत यापेक्षा कमी दराने धान खरेदी केली जात आहे. हा प्रकार लोकमतने बातमीतून बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे उजेडात आणले होते. यातही विशेष बाब म्हणजे बाजार समिती प्रशासनाने या प्रकारावर पांघरून घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १३ नोव्हेंबर रोजी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्र देत शेतकऱ्याप्रतीचा आपला कळवळा व्यक्त केला. तर या निवेदनात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या धानात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने धानाला आधारभूत किंंमत मिळत नसल्याचे नोंदविले आहे. एकाप्रकारे यातून बाजार समितीने आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धानाची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची कबूलीच दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)