शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे रामनवमी साधपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

कोरोनाने सर्व जगाला झपाटले असून सध्या कुणाचेही चित्त ठिकाण्यावर राहीलेले नाही. देशातही तीच स्थिती असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून अवघ्या देशातच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. परिणामी लोकांना घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र शुकशुकाट असून सर्वत्र कोरोनाच्याच चर्चा सुरू आहेत. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या हिंदू धर्मीयांच्या सणांवर होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशोभायात्रा केली रद्द : घरोघरी दीप प्रज्ज्वलन, मंदिरात साध्या स्वरुपात पूजा अर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे अवघ्या जगातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर देशातील सणासुंदीवरही कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनामुळे दरवर्षी निघणारी रामनवमी शोभायात्रा यंदा रद्द करण्यात आली. त्या ऐवजी शहरवासीयांनी आपापल्या घरीच पूजा करून सायंकाळी दीप प्रज्वलन करून रामनवमी साजरी केली.कोरोनाने सर्व जगाला झपाटले असून सध्या कुणाचेही चित्त ठिकाण्यावर राहीलेले नाही. देशातही तीच स्थिती असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून अवघ्या देशातच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. परिणामी लोकांना घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र शुकशुकाट असून सर्वत्र कोरोनाच्याच चर्चा सुरू आहेत. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या हिंदू धर्मीयांच्या सणांवर होत असल्याचे चित्र आहे.२५ मार्चपासून नवरात्रीला सुरूवात झाली असून ‘लॉकडाऊन’मुळे नवरात्री कशी निघून हेच कळले नाही. विशेष म्हणजे, दरवर्षी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने येथील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापन केली जाते. रामनवमीच्या दिवशी शहरात शोभायात्रा काढली जाते. त्याचप्रकारे श्री रामजन्म उत्सव समितीच्यावतीनेही शोभायात्रा काढली जाते. मात्र यंदा रामनवमी शोभायात्रेवर कोरोनाचे सावट दिसून आले. परिणामी शोभायात्रा रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे यंदा बजरंग कार्यालयातच श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. गुरूवारी (दि.२) रामनवमीनिमित्त पूजा अर्चा करून रामजन्म साजरा करण्यात आला.दीप प्रज्ज्वलनाने शहर प्रकाशमानकोरोनामुळे रामनवमी शोभायात्रा रद्द करण्यात आली असली तरीही शहरवासीयांनी आपल्या घरीच रामजन्म साजरा करून सायंकाळी दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी ७.३० वाजता शहरवासीयांनी आपापल्या घरीच दीप प्रज्वलित करून रामजन्मोत्सव साजरा केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRam Navamiराम नवमी