दारूमुळेच होत आहेत महिलांचे संसार उद्ध्वस्त

By Admin | Updated: March 8, 2015 01:14 IST2015-03-08T01:14:01+5:302015-03-08T01:14:01+5:30

जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात.

Due to alcohol, women's world is ruined | दारूमुळेच होत आहेत महिलांचे संसार उद्ध्वस्त

दारूमुळेच होत आहेत महिलांचे संसार उद्ध्वस्त

लोकमत
मुलाखत
गोंदिया : जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. याशिवाय नवीन जोडप्यांमध्येही एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातूनही घटस्फोटाच्या दारापर्यंत प्रकरणे येऊन ठेपतात. या प्रकरणांत समझोता घडवून आणण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर यादृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने समुपदेशन झाल्यास अशा तक्रारींचे प्रमाण अजून कमी होऊ शकते, असे मत गोंदिया शहर ठाण्यातील महिला समुपदेश केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड यांनी व्यक्त केले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या येणाऱ्या तक्रारी, त्यामागील पार्श्वभूमी आणि उपाय यावर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
महिलांच्या पती व सासुरच्या मंडळींविषयी करण्यात आलेल्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पोलीस विभागामार्फत जिल्हास्तरावर महिला समूपदेशन केंद्र तयार करण्यात आले. सन २०१४ या वर्षात पोलिसात सासरच्या मंडळींविषयी करण्यात आलेल्या ३९६ तक्रारी करण्यात आल्या. यापैकी १७८ प्रकरणात तडजोड करून त्यांना त्यांच्या संसारिक जीवनात या महिला तक्रार निवारण केंद्राने गुंतविले. समजावूनही ऐकत नसलेल्या ८१ दाम्पत्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा सल्ला शेवटी त्यांना देण्यात आला.
वारंवार नोटीस पाठवूनही समझोता करण्यासाठी समूपदेशन केंद्रात न येणाऱ्या १०६ प्रकरणांना फाईलबंद करण्यात आले. सन २०१५ मध्ये ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली. या सर्व प्रकरणांची परिस्थिती पाहता पतीला जडलेले दारूचे व्यसन, त्यातच घर सांभाळण्यासाठी पैसे देत नसल्यामुळे बहुतांश महिलांनी पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यांत महिलांचे समूपदेशन करण्यासाठी पोलीस विभागाकडून समूपदेशन केंद्र नाहीत. मात्र गोरेगाव, सडक-अर्जुनी व आमगाव येथे पंचायत समितीकडून समूपदेशन केंद्र तर जिल्हा परिषदेकडून गोंदिया शहरात समूपदेशन केंद्र आहे. महिला व बालविकास आयुक्तालय, पुणेतर्फे दिशा महिला समूपदेशन जिल्ह्यातील तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, देवरी व गोंदिया या चार पोलीस उघडण्यात आले आहेत. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांत पोलीस विभागाकडून तक्रार निवारण केंद्र आहे. मात्र तिथे वकील उपलब्ध नाही. जी प्रकरणे त्या स्तरावर हाताळणे शक्य होत नाही त्यांना जिल्हास्तरावर पाठविले जाते. (तालुका प्रतिनिधी)

हेल्पलाईनवर ४ वर्षापासून एकही तक्रार नाही
महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी गोंदिया पोलीस विभागातर्फे सन २०११ मध्ये नियंत्रण कक्षात टोल फ्री हेल्पलाईन क्र.१०९१ हे तयार करण्यात आला. परंतु या हेल्पलाईनच्या क्रमांकावर मागील चार वर्षात महिलांची एकही तक्रार आली नाही हे विशेष. म्हणजेच महिलांच्या हेल्पलाईनविषयी जनजागृती करण्यात कुठेतरी कसर राहिली, असे यावरून म्हणता येईल.

Web Title: Due to alcohol, women's world is ruined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.