मासुलकसा घाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 17:24 IST2017-10-06T17:23:55+5:302017-10-06T17:24:02+5:30
देवरी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास देवरीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पितांबरटोला/मासुलकसा घाटाजवळ घडली.

मासुलकसा घाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
देवरी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास देवरीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पितांबरटोला/मासुलकसा घाटाजवळ घडली.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास सुमारास एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात बिबट्या जागीच ठार झाला. या मार्गावरुन जाणा-या काही वाहनचालकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. त्यांची लगेच देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.बी. मारबते, वन्यजीवचे वनरक्षक कटरे यांना यासंबंधीची माहिती दिली.
माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता सदर बिबट्याचा मृताअवस्थेत आढळला. त्यांनी लगेच मौका पंचनामा केला. बिबट्याचे शवविच्छेदनाकरिता देवरी येथे नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोडेकर यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. यावेळी सहायक वनसंरक्षक पाटील व शेख यांच्या उपस्थित होते.