वडेगावचे औषधी प्रकरण दडपले?

By Admin | Updated: May 29, 2015 01:19 IST2015-05-29T01:19:54+5:302015-05-29T01:19:54+5:30

तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता उघड्यावर मिळालेला औषध साठा प्रकरण आरोग्य विभागाने दडपले आहे.

Drug cases of Vadegaan suppressed? | वडेगावचे औषधी प्रकरण दडपले?

वडेगावचे औषधी प्रकरण दडपले?

महिना लोटला : अहवालच मिळाला नाही
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता उघड्यावर मिळालेला औषध साठा प्रकरण आरोग्य विभागाने दडपले आहे. या प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी तालुका पासून जिल्हास्तरावरील आरोग्य विभागातील अधिकारी लागले आहेत.
१४ एप्रिल रोजी वडेगाव येथे शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणारे वीटामीन ए (अ जीवनसत्वाच्या) औषधी व बालकांसाठी असलेल्या जंतनाशक औषधी उघड्यावर फेकण्यात आल्या होत्या. या संदर्भात दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तिरोडाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. आर. टेंभूर्णे यांना दिले. डॉ. टेंभूर्णे यांच्या कार्यक्षेत्रातील हे प्रकरण असल्याने सत्यता ते कसे पुढे आणणार? त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील वरिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यायला हवे होते. असा आक्षेप बातम्यातून घेतल्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणासाठी दोन सदस्यीय चमू जिल्हा स्तरावरून नियुक्त केली. परंतु त्या चमूनेही स्वत: चौकशी न करता तालुका वैद्यकीय अहवाल देतील व तेथील वैद्यकीय अधिकारी अहवाल दिल्यावर पुढची दिशा ठरवू अश्या आशेवर ते राहीले.
या प्रकरणाला महिनाभराचा कालावधी लोटला असतानाही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हा स्तरीय चमूने स्वत: पाहणी केली नाही. ते तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालाची वाट पाहत होते त्या दोघांचा अहवाल न दिल्यामुळे चमूची चौकशी जशीच्या तशीच आहे.
बालकांना देण्यात येणारे औषध उघड्यावर फेकण्यात येते मात्र त्या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्य विभाग घेत नाही यामुळे या प्रकरणी तर्कवितर्क लावले जात आहे.
वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला सन २०१३-१४ या वर्षात आॅक्टोंबर महिन्यात अल्बेनेझोल ही जंतनाशक व अ जीवनसत्वाच्या औषधीचा साठा पुरविण्यात आला. वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने लाखेगाव, मुरमाडी, कोयलारी, वडेगाव, नवेझरी, कोडेलोहारा या सहा उपकेंद्रांना या औषध पुरविल्या गेल्या. याच परिसरात ही औषध आढळली आहे. जिल्हा स्तरीय चौकशी समितीने वडेगाव येथील औषध साठ्याची चौकशी अद्याप केली नाही. या औषधातील विटामीन ‘ए’चा बॅच नंबर वडेगाव आरोग्य केंद्राचा असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. आर टेंभूर्णे यांनी सांगितले होते. (तालुका प्रतिनिधी)
टीएमओ म्हणतात, वैद्यकीय अधिकारी दोषी
त्या आरोग्य केंद्रातील औषधांचा साठा रजिस्टरप्रमाणे बरोबर आहे. मात्र ही औषधी मिळाल्यावर तेथील डॉ.महेंद्र धनविजय यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसात करायला हवी होती. त्या औषधीचा पंचनामा करायला हवा होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर त्या ठिकाणची औषधी उचलण्यात आली. यामुळे या प्रकरणाला दडपण्याचे डॉ.धनविजय यांनी प्रयत्न केल्याचे व यात ते दोषी असल्याचे तिरोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे यांनी सांगितले.

Web Title: Drug cases of Vadegaan suppressed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.