पिण्याच्या पाण्याचा होतोय अपव्यय
By Admin | Updated: March 14, 2015 01:25 IST2015-03-14T01:25:43+5:302015-03-14T01:25:43+5:30
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगुर बगिचा परिसरात नळ योजने अंतर्गत पाईप लाईन घालण्यात आली.

पिण्याच्या पाण्याचा होतोय अपव्यय
गोंदिया : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगुर बगिचा परिसरात नळ योजने अंतर्गत पाईप लाईन घालण्यात आली. मात्र गजानन कॉलनी परिसरात ही पाईप लाईन अर्धवटच सोडल्यामुळे तेथून अनेक महिन्यांपासून सतत पाणी वाहत जावून पाण्याचा अपव्यय होत आहे.
या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे अपव्यय होत असून उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता आहे. अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला व ग्रामपंचायत सदस्यांना सदर प्रकाराबाबत तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे पिण्याचे पाणी पाईप लाईनमधून सतत वाहात जावून पाण्याचे अपव्यय होत आहे.
या गंभीर प्रकरणाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने व नळ योजनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाईप लाईनमधून होण्याच्या पाण्याचे अपव्यय बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(प्रतिनिधी)