लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची लागवड कर्नाटक, आंध्र, तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्रातही मोठ्चा प्रमाणात होत आहे. डेंग्यू, मलेरिया, कावीळसारख्या विषाणूजन्य आजारांत प्लेटलेट्स वाढविण्यासाठी या फळाची शिफारस केली जाते. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ड्रगन फ्रूटचे नियमित सेवन केल्याने शरीर बळकट होण्यास मदत होते. पांढऱ्या पेशी वाढविण्यातही ड्रॅगन फ्रूटचा उपयोग होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
कॅल्शिअम, फॉस्फरसड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. अॅण्टि ऑक्सिडंट गुणधर्मामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या सुधारते. त्वचाही चांगली व शरीरही बळकट होते. त्याचबरोबर फॉस्फरस असल्यानेही रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिमोग्लोबिनवाढीसाठीड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघू शकते. शिवाय ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.
हृदयासाठीही उपयुक्तया फळातील अॅण्टिऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. हे फळ रक्तातील प्राणवायूचा प्रवाह योग्य राखते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी व्हायरल आजारात प्रतिकारशक्ती वाढविण्यात ड्रॅगन फ्रूट अत्यंत फायदेशीर ठरते.
पचन संस्था सुधारतेड्रॅगन फ्रूटमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.
"ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन-सी, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, प्रोटीन आदी अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्यास प्रतिकारशक्ती वाढते, रक्तातून योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होतो, हृदयही निरोगी राहते."- डॉ. इल्तियाशा गुप्ता, लाइफस्टाइल कोच व आयुष डॉक्टर