डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक जयंती उत्सव समितीची सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:53+5:302021-02-06T04:53:53+5:30

अध्यक्षस्थानी डॉ. मनोज राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र कठाने, प्रा. रोशन मडामे, अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम, निलू ...

Dr. Meeting of Babasaheb Ambedkar Social Jayanti Utsav Samiti in excitement | डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक जयंती उत्सव समितीची सभा उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक जयंती उत्सव समितीची सभा उत्साहात

अध्यक्षस्थानी डॉ. मनोज राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र कठाने, प्रा. रोशन मडामे, अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम, निलू मोहंती, दर्शना वासनिक, ललीता बोंबर्डे आदी उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सामाजिक जयंती उत्सव या शिर्षकाखाली १४ एप्रिल रोजी जयंती साजरी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच सन २०२१ मध्ये होणारी बाबासाहेबांची जयंती ही एकच होणार व जर कोणी दुसरी जयंती करीत असेल तर समाजातील लोकांनी त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नये असेही ठरविण्यात आले. याप्रसंगी यंदा जयंती कार्यक्रमात सर्व महिला समन्वयक म्हणून कार्य करतील. समन्वयक समितीकरिता स्मिता गणवीर, संध्या बनसोड, विलास वासनिक, सुशील वनकर, प्रा. किशोर वासनिक, निलू मोहंती, पौणिमा नागदेवे ही नावे सुचविण्यात आली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वैशाली खोब्रागडे यांनी केले.

सभेसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बुद्धिस्ट समाज संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भीमघाट स्मारक समिती, कोरणी घाट पर्यटन विकास समिती, आंबेडकर चळवळीचे संस्कार केंद्र, संविधान मैत्री संघ, युवा चॅलेंज ग्रुप, कुंभारेनगर महोत्सव ग्रुप, जागतिक धम्म परिषद, लुम्बिनी युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन, बुद्धविहार समिती, बुद्धिस्ट एंटरप्रेन्योर्स- असोसिएशन ऑफ कॉमर्स अंँड इंडस्ट्री, संविधान महोत्सव समिती (छोटा गोंदिया), क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Dr. Meeting of Babasaheb Ambedkar Social Jayanti Utsav Samiti in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.