शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे रस्त्यांवर कुणाचेही सामान नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवत असल्याने वाहनांना जागा उरत नसून ते रस्त्यावर येतात. अशात वाहतुकीची कोंडी होत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो; मात्र आता यापुढे कुणाचेही सामान रस्त्यावर असल्यास जप्त केले जाणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून वाहतूक नियंत्रण शाखा व नगर परिषदेने मंगळवारपासून (दि.८) संयुक्तरित्या मोहीम राबविली. शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यापर्यंत गेल्या असून त्यांनाही असाच अनुभव आला आहे. यावर त्यांनी मंगळवारी (दि.८) वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे, शहर ठाणेदार महेश बनसोडे, नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अनिल दाते, रवींद्र कावडे यांच्यासोबत बाजारात पाहणी करून रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, मंगळवारी (दि.८) बाजारात मोहीम राबवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानदारांनी ठेवलेले सामान त्यांना उचलण्यास सांगितले. 

अन्यथा सामान केले जाणार जप्त 

- दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी अधिकाऱ्यांनी मोहीम राबविल्यानंतर काही दुकानदारांनी त्यांचे बोर्ड रस्त्यावर आणून ठेवल्याचे दिसले; मात्र आता ही मोहीम सातत्याने राबविली जाणार असून कुणाचेही सामान रस्त्यावर दिसून आल्यास मात्र काहीही न सांगता ते जप्त केले जाणार आहे. यामुळे आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवणे त्यांच्यासाठीच नुकसानीचे ठरणार आहे. 

बाजारातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. अशात दुकानदार त्यावर सामान ठेवत असल्याने वाहतुकीला अडचण होते; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान न ठेवता सहकार्य करावे. अन्यथा त्यांचे सामान जप्त केले जाणार. - दिनेश तायडेनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा 

दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवले जात असल्याने वाहनचालकांना जागा मिळत नाही व ते रस्त्यावर वाहन ठेवतात. यामुळे वाहतुकीला अडचण होते व नागरिकांना त्रास होतो; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवू नये. - करण चव्हाण मुख्याधिकारी, नगर परिषद

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण