भिकेतून जमविलेल्या पैशाने दिला पुतळा दान

By Admin | Updated: January 28, 2015 23:35 IST2015-01-28T23:35:01+5:302015-01-28T23:35:01+5:30

गेल्या सात-आठ वर्षापासून घराबाहेर राहून आणि भिक्षा मागून जगत दोन पैसे जमविणाऱ्या सुकडी-खैरी या गावातील आत्माराम कवळू गणवीर या व्यक्तीने आपल्या औदार्याचा परिचय दिला.

Donation of donation by money collected from begging | भिकेतून जमविलेल्या पैशाने दिला पुतळा दान

भिकेतून जमविलेल्या पैशाने दिला पुतळा दान

रमाबाईचा पुतळा : सुकळीच्या आत्मारामचे असेही औदार्य
मुन्नाभाई नंदागवळी - बाराभाटी
गेल्या सात-आठ वर्षापासून घराबाहेर राहून आणि भिक्षा मागून जगत दोन पैसे जमविणाऱ्या सुकडी-खैरी या गावातील आत्माराम कवळू गणवीर या व्यक्तीने आपल्या औदार्याचा परिचय दिला. त्यांनी बौध्द समाजाला मातोश्री रमाबाईचा पुतळा दान देऊन समाजापुढे आपले अनोखे औदार्य दाखवून दिले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाराभाटीजवळील सुकळी-खैरी येथील रहिवासी असणारे आत्माराम गणवीर यांनी गावात रमाबाईचा पुतळा स्थापन करावा अशी इच्छा व्यक्त केली. मात्र त्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. स्वत:जवळ पुतळा उभारण्याइतपत पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत: रेल्वेमध्ये भिक मागून पैसे जमविले आणि सुकळीतील बौध्द समाजाला मातोश्री रमाबाईच्या पुतळ्यासाठी १३ हजार रुपये दिले.
गणवीर हे स्वत:च्या घरून गेल्या सात-आठ वर्षापासून बाहेर आहेत. कुठेही मिळेल तिथे खाणे व राहणे हा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. असे करता-करता त्यांनी रेल्वेमध्ये भीक मागणे सुरू केले.
भिकेतून मिळालेल्या पैशामधून त्यांनी स्वत:च्या नातवंडाला मोटारसायकल घेवूून दिली. त्याचबरोबर नातीच्या लग्नसमारंभाला पैशाची मदत केली असेही गणवीर यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी केला सत्कार
गणवीर यांच्या देणगीतून उभारलेल्या रमाबाईच्या पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आत्माराम गणवीर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. ते भिकारी नसून एक समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ता असल्याचे गौरवोद्गार यावेळी अनेकांनी काढले.

Web Title: Donation of donation by money collected from begging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.