३१ तारखेला देणार ‘दो बूंद जिंदगी के’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:13+5:302021-01-25T04:30:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भारत देश पोलिओमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या पोलिओ लसीकरणांतर्गत आता येत्या ३१ तारखेला ५ वर्षाखालील ...

३१ तारखेला देणार ‘दो बूंद जिंदगी के’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारत देश पोलिओमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या पोलिओ लसीकरणांतर्गत आता येत्या ३१ तारखेला ५ वर्षाखालील बालकांना ‘दो बूंद जिंदगी के’ दिले जाणार आहेत.
० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा धोका असल्यामुळेच त्यांना पोलिओचा डोस दिला जातो. १५ जानेवारी रोजी हा पोलिओ डोस दिला जाणार होता. मात्र, १६ तारखेपासून कोरोना लसीकरण सुरू झाले व त्यामुळे १५ तारखेचा पोलिओ डोसचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. आता कोरोना लसीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाली असून, त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिओ डोससाठीचे नियोजन करत आता येत्या ३१ तारखेला ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविली जाणार आहे.