शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

By admin | Updated: October 17, 2016 00:38 IST

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पावन दीक्षाभूमिवर १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

गोंदिया : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पावन दीक्षाभूमिवर १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तसेच आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा एतिहासिक दिवस ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बाह्मणी-खडकीमध्ये भीमज्योतबाम्हणी : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध बांधवांच्या वतीने बुद्ध विहारात सलग पाच दिवसीय भीमज्योत कार्यक्रम घेतला. तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.उद्घाटन डॉ. सूरसाऊत यांच्या हस्ते, डॉ. भूषण मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून अनिल दोनोडे, सरपंच रमेश इळपाते, कृष्णा ठलाल, देवानंद तागडे, सरपंच शारदा मेश्राम, गजभिये, बोरकर, साधू तागडे, वामन गजभिये, भीमराव रामटेके, मोरेश्वर मेश्राम, हिरालाल गजभिये उपस्थित होते. पाच दिवसपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले. संचालन राजेश मेश्राम यांनी केले. आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.बुद्धविहार धम्मप्रचार समिती बिजेपार : बुद्ध धम्मात मानवी जीवनाचा उत्कर्ष आहे. धम्म माणसाला आशावादी बनवितो. स्वाभिमानाची प्रेरणा धम्मातूनच मिळते. हजारो वर्षे अधिकारापासून वंचित शोषितांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देवून त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. गुलामगिरी व विषमतेच्या श्रृंखला तोडून न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली व या सर्व बाबी आम्हाला दीक्षेमुळे मिळाल्या, असे प्रतिपादन प्रबोधनकार शैलेंद्रकुमार टेंभुर्णीकर यांनी केले. बिजेपार येथे बुद्धविहार धम्मप्रचार समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी शंकरराव बडोले होते. अतिथी म्हणून सरपंच नितू वालदे, पोलीस पाटील वनिता वाघमारे, अ‍ॅड. शंभरकर, हरिशचंद्र वाघमारे, जे.जे. कोचे, पं.स. सदस्य दिलीप वाघमारे, राजेंद्र वालदे उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, बुद्धाचा धम्म देशविदेशात पोहोचला. परंतु भारतात मात्र शोषित-वंचित काही अल्पजणांनीच धम्म स्वीकारला. इतर भारतीय त्यापासून कोसो दूर आहे, ही खेदाची बाब आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेबांचा संघर्ष व्यवस्था परिवर्तनासाठी होता. ज्ञान, धन व सत्ता यापासून ज्यांना नेहमी वंचित ठेवण्यात आले, त्यांच्या मानवी न्याय्य हक्कासाठी होता, असे ते म्हणाले.कार्यक्रमासाठी ऋषभ वालदे, निखिल चंद्रिकापुरे, अभिषेक अंबादे, अशोक शहारे, दिलीप बंसोड, मुस्कान वालदे, दिपाली बंसोड, ऋतू भैसारे, कृतिका भैसारे यांनी सहकार्य केले.करूणा बुद्ध विहार केसलवाडा : येथील करूणा बुद्ध विहारामध्ये ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यापक पी.डी. रामटेके होते. अतिथी म्हणून खुशाल शहारे, एम.ए. रामटेके, रनभिड शेंडे, अनिल शहारे, शंकर शहारे, सुखदास बन्सोड, अनिल शेंडे, भाऊदास मेश्राम, कृष्णा शहारे, अजय घोडीचोर उपस्थित होते. संचालन अशोक शहारे यांनी केले. आभार खुशाल शहारे यांनी मानले.गोठणगावात धम्मरॅली गोठणगाव : येथील वार्ड एक व तीनमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. धम्मरॅली काढून समतेचे नारे लावण्यात आले. सकाळी पोलीस निरीक्षकांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला वालदे होत्या. सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली. सायंकाळी ४ वाजता शांतीच्या मार्गाने धम्मरॅली काढण्यात आली. हातात निळे झेंडे व मेणबत्ती घेवून ही रॅली वार्डांमध्ये फिरली. दोन्ही वार्डात सामूहिक भोजन देण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमासाठी तंमुसचे अध्यक्ष सचिन डोंगरवार, स्वच्छता समिती अध्यक्ष दीपक राऊत, दिनदयाल रामटेके, कांतिलाल डोंगरवार, मिथून टेंभुर्णे, रवी टेंभुर्णे, विजय तिरपुडे, प्रवीण भोवते, प्रवीण शहारे, सौरभ राऊत, मुन्ना शहारे, माणिक रामटेके, विमल बडोले, हर्षद वालदे, विक्की कराडे, मनोज रामटेके आदींनी सहकार्य केले.