जिल्ह्यात ५६१ दुर्गा, ५५१ शारदा
By Admin | Updated: October 12, 2015 02:01 IST2015-10-12T02:01:39+5:302015-10-12T02:01:39+5:30
नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून (दि.१३) सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे.

जिल्ह्यात ५६१ दुर्गा, ५५१ शारदा
१० ठिकाणी रावणदहन : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे सहकार्य घेणार
गोंदिया : नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून (दि.१३) सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सदस्य उत्सव मंडळांना सहकार्य करणार आहेत.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ३५ दुर्गा, ३० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २० दुर्गा व २० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५७ दुर्गा व २८ शारदा स्थापन होणार आहे.
आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ७० दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ६९ दुर्गा व ३८ शारदा स्थापन होणार आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा व ५७ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२ दुर्गा व ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १५ दुर्गा व ६४ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५० दुर्गा व ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५ दुर्गा व २५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २३ दुर्गा व ४५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४० दुर्गा व ८ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५५ दुर्गा व १६ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. दुर्गा किंवा शारदा देवीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी उत्सव मंडळांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेणार आहेत. जिल्ह्यात २२ ठिकाणी गरबा खेळला जाणार आहे, तर १४ ठिकाणी दसऱ्याला रावणदहन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाची धूम व परंपरा काही औरच असल्याने बघावे तेथे उत्सवाच्या तयारीची धावपळ दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
२२ ठिकाणी गरबा
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत ६ ठिकाणी गरबा व ४ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ५ ठिकाणी, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत २ ठिकाणी, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत १ गरबा खेळला जाणार आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १० ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत १ ठिकाणी गरबा, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत १ ठिकाणी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत २ ठिकाणी, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ३ ठिकाणी, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत १ ठिकाणी गरबा होणार आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांच चोख बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला मनुष्यबळ पुरविण्यात आला आहे. गृहरक्षक दलाच्या महिला व पुरूषांना मदतीसाठी बोलावण्यात आले आहे. वेळ पडल्यास महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची मदत घेतली जाणार आहे.