गावकऱ्यांना माक्स व साबण वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:14+5:30

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या सूचना देऊन सजग राहण्यासंबंधी जनजागृती केली जात आहे. गावात सर्वत्र स्वच्छता राहावी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

Distribute wax and soap to villagers | गावकऱ्यांना माक्स व साबण वाटप

गावकऱ्यांना माक्स व साबण वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देशिवणकाम करणाऱ्यांना काम : साहित्यांचे घरपोच वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतच्यावतीने गावकºयांत जनजागृती करुन सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. ‘गड्या आपले गाव सांभाळा’ या वचनपूर्तीची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय तसेच जि. प. सदस्य कमल पाऊलझगडे यांच्या संयुक्तवतीने गावकरी तसेच शासकीय तथा निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी व हितचिंतकांना कापडी मास्क व साबणाचे घरपोच वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या सूचना देऊन सजग राहण्यासंबंधी जनजागृती केली जात आहे. गावात सर्वत्र स्वच्छता राहावी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. गावातील मुख्य चौकात दुकानांसमोर गर्दीचे दिसू नये म्हणून कोरोना आपातकालीन गाव समितीची नियुक्ती करुन संपूर्ण गावकºयांना जीवघेण्या विषाणूपासून सावध रहा असे समितीकडून सांगण्यात येते. गावातील जे कोणी शहराच्या ठिकाणाहून आले त्यांना शिक्का मारुन होम क्वारंटाईन करण्यात आले. मंगळवारी भरणाºया आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली.
ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामपंचायत व जि.प.सदस्य पाऊलझगडे यांच्यावतीने सर्व ग्रामस्थांना कापडी माक्स व साबणाचे वाटप करण्यात आले.
यासाठी ६ पथक बनविण्यात आले आहे.माक्स व साबण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, ग्रा. पं.सदस्य अमरचंद ठवरे, राकेश लंजे, साधू मेश्राम, विठ्ठल झोळे, रंजना बोरकर, दिपीका गजभिये, मिनाक्षी झोळे, किरण शेंद्रे, तंमुस अध्यक्ष श्रीकांत बनपूरकर, रत्नाकर बोरकर, रवि बनपूरकर, बाळू पर्वते, कुकसू मेश्राम, पुस्तकला बरय्या, कैलाश धावडे, राष्ट्रपाल ठवरे, किशोर शहारे, गुड्डू मेश्राम, दिपक तिपातले आदिनी सहकार्य केले.गावकºयांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. ग्रामविकास अधिकारी पी. एम. समरीत गावातील हालचालींवर लक्ष ठेवून या परिस्थितीत गरजूंना त्रास होणार नाही याची दक्षता घेत आहे.

अनेकांना मिळाले काम
कापडी माक्स गावातच बनविण्यात आले. घरी शिवणकाम करणाऱ्या महिला व पुरुषांकडून कापडी माक्स तयार करण्यात आले. २ हजार माक्स गावातील कारागिरांनी तयार केल्यामुळे ‘लॉकडाऊन’ स्थितीत त्यांना रोजगार मिळाला. गावातील २५ महिला-पुरुषांनी माक्स बनविण्याच्या कामात योगदान दिले. शिवणकाम करणाºया प्रत्येकांना प्रती माक्स ३ रुपये प्रमाणे मोबदला देण्यात येणार असल्याचे समरीत यांनी सांगितले.

Web Title: Distribute wax and soap to villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.