जि. प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST2021-07-28T04:29:56+5:302021-07-28T04:29:56+5:30

मंगळवारी (दि.२७) थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम ...

Dist. W. Suyash of high school students | जि. प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

जि. प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

मंगळवारी (दि.२७) थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी एनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सौरव लेकचंद बडोले, विशाखा लेखराम मुनिश्वर, वैशाली रामदास पुसाम, अवेश जवाहरलाल शहारे, हिमांशी अर्जुन गजबे व पवन भोजराज बनकर या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, ए. ए. पेन आणि थोर पुरुषांचे चरित्र पुस्तके मुख्याध्यापक मेश्राम यांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक डी. पी. डोंगरवार, आर. जी. पुस्तोडे, वर्गशिक्षक डब्ल्यू. ए. परशुरामकर, एन. आर. गिरेपुंजे, प्राची मेंढे उपस्थित होते. मेश्राम यांनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संचालन एन. आर. गिरेपुंजे यांनी केले, तर आभार डी. पी. डोंगरवार यांनी मानले.

Web Title: Dist. W. Suyash of high school students