प्रशासनाच्या सावत्र भुमीकेमुळे असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:32+5:30
येथील एका मोठ्या अधिकाऱ्याचे कुटुंब बाधीत आढळले आहे. मात्र त्याचे रहिवासी क्षेत्र अद्यापही कं टेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले नाही. तर दुसरीकडे शहरासह काही ग्रामीण भागात बाधीत रूग्ण आढळले असता संबंधित बाधीतांच्या कार्यक्षेत्राहून पलिकडेही कंटेन्मेंट झोन तयार जाहीर करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती बाधीत आढळल्यास त्याला उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात येते.

प्रशासनाच्या सावत्र भुमीकेमुळे असंतोष
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : कोरोनाच्या नावाखाली प्रशासकीय यंत्रणेकडून सर्व सामान्य नागरीकांसोबत चागंलाच खेळ खेळला जात आहे. संसर्गाची खबरदारी म्हणून बाधीत व्यक्ती परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला जात आहे. मात्र यामध्ये महसूल विभागातील अधिकारी सावत्र भुमीकेचा परिचय देत असल्याने शहरासह ग्रामीण भागात सुद्धा सामान्य लोकात चांगलाच असंतोष पसरला आहे.
येथील एका मोठ्या अधिकाऱ्याचे कुटुंब बाधीत आढळले आहे. मात्र त्याचे रहिवासी क्षेत्र अद्यापही कं टेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले नाही. तर दुसरीकडे शहरासह काही ग्रामीण भागात बाधीत रूग्ण आढळले असता संबंधित बाधीतांच्या कार्यक्षेत्राहून पलिकडेही कंटेन्मेंट झोन तयार जाहीर करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती बाधीत आढळल्यास त्याला उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात येते. अटी शर्तीच्या अधिन राहून त्याच्यावर उपचार केला जातो. त्यातच राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हाप्रशासनाने लक्षणरहीत बाधीत व्यक्तीच्या घरी जागा असल्यास त्याच्या घरीच उपचार घेण्याची सवलत दिली आहे. मात्र तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने या अटी शर्तीचा लाभ घेत चांगलीच धमाल उडविली आहे. यांतर्गत, एका बाधीत अधिकाऱ्याला शासकीय विश्रामग्रृहात राहण्याची मुभा दिली आहे.
त्यामुळे कोरोनाच्या नावावर सर्व सामान्यांची पिळवणूक करणे आणि यंत्रणेतील अधिकारी किंवा वजनदार व्यक्तिला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रकार दिसून येत आहे. या प्रकाराने शहरासह ग्रामीण भागत खमंग चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नावावर यंत्रणेच्या सावत्र भुमिकेवरही संताप व्यक्त करीत नागरीक प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत.
आरोग्य विभागाचा मनमर्जी कारभार सुरू
मंगळवारी ग्राम फुटाणा येथे एक रूग्ण आढळल्याचे सांगून महसूल विभागाचे कोणतेही आदेश नसताना गावात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानीं आपल्या मनमर्जीने कंटेन्मेंट झोन जाहीर करुण रस्ता अडवून मुनादी देण्यात आली. याबाबत आरोग्य विभाग व फुटाना ग्रामंपचायतशी संपर्क केला असता बुधवारी दुुपारी २ वाजतापर्यंत कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगीतले. यावरून प्रशासनाविषयी असंतोष पसरला असून फुटाणा गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.