शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. गावागावातील सामान्य जनता दहशतीखाली वावरताना दिसत आहे. ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न केले जाते. शिवाय गावातील कोणताही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जाते. सध्या पावसाचा हंगाम आहे. साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताप खोकला आजारांची साथ सुरु आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अपडाऊन सुरूच : रुग्णांना करावी लागते डॉक्टरची प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील ग्राम चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातून येणाºया रुग्णांना ताटकळत बसून वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. सकाळी रूग्णांची गर्दी असते. मात्र कार्यरत वैद्यकीय अधिकारी वेळेच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होतच नाही अशी सामान्य जनतेची ओरड आहे. कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपडाऊनमुळे दररोज विलंब होत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. बाह्य रुग्णांना ताटकळत डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते.सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. गावागावातील सामान्य जनता दहशतीखाली वावरताना दिसत आहे. ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न केले जाते. शिवाय गावातील कोणताही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जाते. सध्या पावसाचा हंगाम आहे. साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताप खोकला आजारांची साथ सुरु आहे. मात्र ग्राम चान्ना-बाक्टी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिसत आहे. चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजघडीला डॉ. श्वेता कुलकर्णी व डॉ. कुंदन कुलसुंगे हे २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यातील डॉ. कुलसुंगे यांची बोंडगावदेवी येथील जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात सोमवार, बुधवार व शनिवार असे ३ दिवस आठवड्यातून प्रतिनियुक्ती केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण तपसणीची वेळ सकाळी ८ ते १२ वाजतापर्यंत निर्धारित केली आहे. मात्र दवाखान्याच्या निर्धारित वेळेत वैद्यकीय अधिकारी कधीच येत नाही असे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शेंडे यांनी सांगितले.दवाखान्याची कमान सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी वेळेच्या आत येत नाही ही नित्याचीच बाब असल्याचे समजते. गुरुवारी (दि.१३) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्यानंतर खरा प्रकार आढळला.११ वाजतापर्यंत वैद्यकीय अधिकाºयांचा थांगपत्ता नव्हता. दवाखान्यातील एका कर्मचाºयाने भ्रमणध्वनीवरुन त्यांना फोन लावला असता २ वाजतानंतर येते असा निरोप आला. वरिष्ठांची मर्जी असल्याने पीएचसीत अनियमिततेचा कळस गाठला जात असल्याचे बोलले जात आहे.कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त प्रशस्त असे निवासस्थान आहेत. हल्ली दोन्ही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहता आपल्या सोयीने आवागमन करतात. यातील एक वैद्यकीय अधिकारी १५ किमी. तर दुसरा वैद्यकीय अधिकारी ३ किमी. अंतरावरुन येऊन कर्तव्य बजावतात अशी ओरड आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ये-जा प्रवृत्तीने गावखेड्यातील सामान्य जनतेला नाहक ताटकळत राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आरोग्य केंद्रात दिसून येत आहे. कोरोना परिस्थितीत सामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल