रोखपालाच्या अनुपस्थितीत खातेदारांची गैरसोय
By Admin | Updated: May 14, 2014 01:41 IST2014-05-13T23:39:29+5:302014-05-14T01:41:29+5:30
येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कर्मचाऱ्याच्या अभावामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

रोखपालाच्या अनुपस्थितीत खातेदारांची गैरसोय
कालीमाटी : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कर्मचार्यांच्या अभावामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
कालीमाटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कर्मचार्यांचा अभाव तसेच रोखपालांच्या नेहमीच्या अनुपस्थितीमुळे ग्राहकांना बँक व्यवहारात दिरंगाई होत आहे. कालीमाटी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. या शाखांतर्गत सहा हजारावर खातेदार आहेत. हजारोवर खातेदारांना सेवेसाठी फक्त दोन अधिकारी देण्यात आले. याठिकाणी शेकडो खातेदार दैनिक कामासाठी येतात. पण त्यांना वेळेवर व्यवहार करता येत नसल्याकारणाने ग्राहकांत बँकेविरुद्ध रोष दिसून येत आहे.
याठिकाणी बचत खाते, ठेवीदार, खाते उघडण्यासंबंधी, शिष्यवृत्ती, रोहयोचे मजूर, निराधार लाभार्थी, कर्ज आदी कार्यासाठी शेकडो खातेदार दररोज येतात. त्यांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. सदर बँकेत शाखा व्यवस्थापक, रोखपाल स्थायी आहेत. पण रोखपाल रमेश शेंडे अपवाद आहेत. ते नेहमी अनुपस्थित असतात. त्यामुळे रोख व्यवहारात ग्राहकांची गैरसोय होत असल्याची ओरड गावकर्यांत आहे.
१२ मे रोजी रोखपाल शेंडे पुन्हा गैरहजर होते. सकाळी ११.३३ मिनिटापर्यंंंत शाखेत फक्त रोजंदारी कर्मचारी मानकर बँक व्यवहार पार पाडत होते. काही वेळात शाखा व्यवस्थापक बी.एम. मिश्रा आल्यावर खातेदारांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. याठिकाणी कर्मचार्यांची गरज असून सक्षम रोखपाल, लिपिक, परिचर आदींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या बँकेत पेन्शनधारक, अपंग, विधवा महिला, वृद्ध पुरुष-महिला विविध शासनाच्या योजनेतून लाभ मिळतो पण त्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. सदर बँकेत नेहमीच सावळागोंधळ सुरू असते. या प्रकरणी वरिष्ठांनी विराम आणून बँकसेवा सुरळीत करावी, अशी मागणी कृष्णा चुटे, मंगल फुंडे, पुरुषोत्तम हरिणखेडे, जयप्रकाश मेंढे, भोजू ूगिर्हेपुंजे, लीलाधर गिर्हेपुंजे, पुरुषोत्तम टेंभरे, भोजू बहेकार, हेमराज फुंडे आदींनी केली आहे. (वार्ताहर)