दिव्यांग शिक्षक पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:18+5:302021-01-14T04:24:18+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत दिव्यांग शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित असून, संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष ...

Disabled teacher deprived of promotion | दिव्यांग शिक्षक पदोन्नतीपासून वंचित

दिव्यांग शिक्षक पदोन्नतीपासून वंचित

गोंदिया : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत दिव्यांग शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित असून, संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब पुढे आली आहे.

दिव्यांग शिक्षक संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग शिक्षकांना त्यांच्या योग्यतेनुसार मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याचे शासन आदेश आहेत. त्यानुसार, विभागीय आयुक्त नागपूर यांचे ३ जुलै, २०२०च्या पत्रानुसार जिल्हा परिषदेला दिव्यांग शिक्षकांची पदोन्नती करण्याचे आदेशित केले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांचे पत्र ३ ऑगस्ट, २०२० नुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभाग वगळता सर्वच विभागाची सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता यादी तयार करण्यात आली आहे, परंतु प्राथमिक शिक्षण विभागाने सहा महिने उलटून अद्याप दिव्यांग शिक्षकांची यादी तयार केलेली नाही, शिवाय पदोन्नतीच्या कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक हिवारे यांनी लक्ष देऊन दिव्यांग कर्माव्हारी(??) पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी, अशी मागणी दिव्यांग कर्मचारी संघटनांनी केली आहे.

Web Title: Disabled teacher deprived of promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.