घनकचºयावर तोडगा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:08 IST2017-09-03T21:08:03+5:302017-09-03T21:08:18+5:30

शहरातील घनकचºयाच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा सापडत नसल्याचे दिसते. बघावे तेथे लागलेले कचºयाचे ढीग त्याची प्रचिती करवून देतात.

Difficulty finding solutions | घनकचºयावर तोडगा मिळेना

घनकचºयावर तोडगा मिळेना

ठळक मुद्देबघावे तेथे कचºयाचे ढीग : सणासुदींचेही सोयरसुतक नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील घनकचºयाच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा सापडत नसल्याचे दिसते. बघावे तेथे लागलेले कचºयाचे ढीग त्याची प्रचिती करवून देतात. सण असो वा उत्सव मात्र कचºयाची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास कोंडत चालला असून आणखी किती दिवस असे वावरावे लागणार असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगर पंचायती आपल्या पायावर उभे होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. स्वच्छतेसाठी नगर पंचायतींमध्ये नवनवे प्रयोग राबविले जात असून त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पुढाकार घेत आहेत.
मात्र जिल्ह्याचे स्थळ असलेल्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. कारण शहरातील कचºयाची स्थिती आता बारमाहीच झालेली आहे. दिवस उजाडत चालले आहेत मात्र शहरवासीयांना घाणीच्या विळख्यात श्वास घ्यावा लागत आहे.
बघावे तेथे कचºयाचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचºयाची नित्यनेमाने उचल केली जाते.
मात्र दुसºया दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे. यातून स्वच्छतेसाठी पाहिजे तसे प्रयत्न होत आहे की नाही असा प्रश्न पडतो. ते काही असो, मात्र या सर्वांचा त्रास शहरवासी भोगत आहेत. यातून नगर परिषदेचा स्वच्छता विभाग कोठेतरी कमकूवत पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नसून. आजघडीला शहरवासीयांचा नगर परिषद व निवडून दिलेल्या नगरसेवकांवरून विश्वास उडत चालला आहे.
कचºयाचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप, कचºयातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे. अशा या वातावरणात शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे. यावर मात्र नगर परिषदेकडून तोडगा काढणे कठीण दिसत आहे.
यामुळेच शहराचे वातावरण दिवसेंदिवस दिवस प्रदुषीत होत चाचले असून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. कचºयाच्या समस्येवर त्वरीत तोडगा काढा अशी ओरड शहरवासी करीत आहेत.

Web Title: Difficulty finding solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.