शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:23 IST

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती : धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठा धरणातील पाणीसाठाइटियाडोह - २९.३ टक्केशिरपूर- ३.५३ टक्केपूजारीटोला - १.६८ टक्केकालीसराड- ५.७४ टक्केसंजयसरोवर- २२.७९ टक्केगोसेखुर्द -१९.७८ टक्केधापेवाडा- २१.३८ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे. पावसाअभावी धान वाळत चालल्याने ती वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड सुरू असल्याचे बिकट चित्र जिल्ह्यात आहे.खरीपात जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यात सर्वाधिक धानाची १ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सुध्दा सावध भूमिका घेत धानाचे पºहे टाकले.जुलै महिन्यात थोडा समाधानकारक पाऊस झाला. आॅगस्ट महिना संपत येत असताना अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पºहे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी कसे बसे पºहे वाचवून रोवणी आटोपली. तर काहींनी जलाशयाचा पाण्याचा आधार घेत रोवणी केली. पण, सुरूवातीपासूनच जलाशयाचे पाणी वापरले तर पुढे काय असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत प्रथमच अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पाऊस लांबल्याने रोवण्या खोळंबल्या असून त्याचा उत्पादनावर परिणामी होण्याची शक्यता आहे. येत्या चार पाच दिवसांत पाऊस न झाल्यास १ लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.धरणामध्ये १० ते १५ टक्के पाणीजिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात शेती अवलंबून आहे. शिवाय यावरच भूजल पातळी अवलंबून असते. मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुध्दा १० ते १५ टक्केच पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहेकेवळ ५८ टक्केच पाऊस१ जून ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधी केवळ ५६० मि.मी.पावसाची नोंद झाली असून केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पावसाची सरासरी उणे आहे.दोन जिल्हे कोरडेचदोन दिवसांपूर्वी विदर्भात गोंदिया व भंडारा जिल्हा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाला. मात्र हे दोन्ही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यास जिल्हा पिकांची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची नाकारता येत नाही.कृषी विभागाने वर्तविली शक्यताआॅगस्ट महिना संपत येत असताना जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर पºहे देखील वाळत चालली आहे. दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासंबंधीचा अहवाल कृषी आयुक्त आणि शासनाकडे पाठविला आहे.