अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:01 IST2019-02-28T01:00:19+5:302019-02-28T01:01:14+5:30
येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी (दि.२७) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यात काही विषयाला घेऊन वाद सुरू आहे. दरम्यान प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२६) त्यांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन सुरू केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यपकांना दर महिन्याला नियमानुसार पूर्ण वेतन देण्यात यावे. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मागील आठ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरीत देण्यात यावे, थांबविण्यात आलेली वार्षिक वेतन वाढ देण्यात यावी तसेच महाविद्यालय बंद न करता पूर्ववत पहिल्या वर्षीचे प्रवेश देणे सुरू करण्यात यावे. या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचे निवेदन प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.या वेळी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.