भाविकांनी घेतले जिवंत नागराजाचे दर्शन
By Admin | Updated: August 23, 2015 00:11 IST2015-08-23T00:11:50+5:302015-08-23T00:11:50+5:30
तिरोडा तालुक्यापासून पूर्व दिशेला १२ कि.मी. अंतरावर खडकी-डोंगरगाव येथे नागपंचमीच्या दिवशी साक्षात पाच जिवंत नागराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

भाविकांनी घेतले जिवंत नागराजाचे दर्शन
सुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यापासून पूर्व दिशेला १२ कि.मी. अंतरावर खडकी-डोंगरगाव येथे नागपंचमीच्या दिवशी साक्षात पाच जिवंत नागराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील अनेक गावातील भाविकांनी नागराजाचे दर्शन घेतले.
प्राप्त महितीनुसार, तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव येथे आंबेतलाव पहाडीवर दगडाच्या फटीत सन १९९९ पासून तीन जिवंत नागराज वास्तवास राहतात. आंबेतलावाच्या पहाडीवर शिवमंदीर बांधण्यात आले. त्याच्या बाजुला दगडाच्या फटीमध्ये तीन जिवंत नागराज वास्तवाला असतात. तेव्हापासून दरवर्षी त्या ठिकाणी नागपंचमी व महाविशवरात्रीला गावाच्यावतीने भजन, कीर्तन, अभिषेक, दहीकाला व महाप्रसादांचे आयोजन केले जाते.
सर्वात महत्वाची बाब अशी की, यंदा नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिराच्या बाजुला दगडाच्या फटीत ३ नाग व बाहेर २ नाग जिवंत सर्वांना दर्शन देत होते. त्या सापांजवळ एक बेडूक, दोन विंचू जिवंत होते. साप व बेडूक हे सोबत कधीच एकत्र राहत नाही. साप बेडकाला खाऊन टाकते. पण त्या ठिकाणी हा एक विचित्र प्रकार पहावयास मिळाला.
नाग मंदिर समितीच्या वतीने शिवमंदीरात अभिषेक करुन पुजाअर्चना करण्यात आली. त्यावेळी महिला भजन मंडळाच्यावतीने भजन, कीर्तन, दहीकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी सामूहीक कार्यक्रम घेण्यात आले. नागपंचमीच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष जि.प. सदस्य रजनी कुंभरे होत्या. प्रमुख पाहुणे जि.प. सदस्य प्रिती रामटेके, पं.स. सदस्य माया शरणागत, सरपंच गीता गोंडाणे, डोंगरगावचे सरपंच दिलीप बिसेन, पो.पाटील साहेबराव बंसोड, मुन्ना रहांगडाले, शामराव कटरे, आर.झेड. बावणे, उपसरपंच महेंद्र कटरे, अध्यक्ष डॉ.फाल्गुन कटरे, हितेंद्र बावणे, छबीलाल पटले, फरणलाल येळे, गजानन कटरे, अरतलाल सोनेवाने, राघोबा कटरे, शिवप्रसाद पांडे, सोनेवाने व मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ.फाल्गुन कटरे यांनी मांडले. संचालन ईश्वर कटरे तर आभार खेमराज कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजू कटरे, धमेंद्र कटरे, रमेश पटले, विजय बावणे, विचित्र कटरे, संपत पटले, तिलकचंद कटरे, वासुदेव सोनेवाने, योगराज बिसेन, बळीराम कटरे, हनवत कुर्वे, छत्रुग्न पटले, कुंजीलाल रहांगडाले, राजकुमार पटले, योगराज कोडेवते, हौसीलाल पटले व समस्त महिला मंडळ व खडकी, डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी सहकार्य केले.