सामूहिक शेती करून विकास साधावा
By Admin | Updated: August 12, 2014 23:50 IST2014-08-12T23:50:27+5:302014-08-12T23:50:27+5:30
शेतकऱ्यांनी सामुहिक शेती व व्यवसाय करून आपला विकास साधावा, जेणेकरून आपला जीवनमान उंचावेल. यामुळे समाजात व ग्रामीण भागात नवीन चेतना निर्माण होईल असे प्रतिपादन

सामूहिक शेती करून विकास साधावा
जिल्हाधिकारी सैनी : चिचगड ठाण्यात नागरिकांशी संवाद
ककोडी : शेतकऱ्यांनी सामुहिक शेती व व्यवसाय करून आपला विकास साधावा, जेणेकरून आपला जीवनमान उंचावेल. यामुळे समाजात व ग्रामीण भागात नवीन चेतना निर्माण होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. चिचगड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, उपविभागीय अधिकारी दुर्गेश सोनवाने, प्रभारी तहसीलदार यामावार, संदीप मस्के आदी उपस्थित होते.
पुढ बोलताना डॉ. सैनी यांनी, गावातील तरुण मुलांनी एकत्र येऊन छोटे मोठे उद्योग सामुहिकरित्या सुरु करावे. त्यात शासन योग्य मार्गदशन व आर्थिक मदत देईल. शेतीचे नवीन पट्टे धारक एकत्र येऊन शेतीत ट्रॅक्टर, इंजन, पाइप सर्व सामग्री शासन उपलब्ध करुन देईल. यातून आपण शेती सोबत जोडधंदा करु शकतो. त्यामुळे आपले आर्थिक स्तर उंचावेल व परिसराचा विकास होईल असे मत व्यक्त केले. तसेच डॉ. सैनी यांनी, चिचगड येथील बचत गटाच्या महिलांसोबत चर्चा केली.
याप्रसंगी, परिसरातील पशुवैद्यकिय दवाखाना, मानविकास अंतर्गत असलेल्या बसेस, भ्रमनध्वनी सेवा इत्यादी सेवा केंद्र, बँक, शिक्षणाविषयी असलेल्या अडचणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्याकडे मांडल्या.
कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश जामनिक यांनी केले. या कार्यक्रमाला ककोडी, येळमागोदी, कडीकसा, पोलादुर, बोंडे, मगरडोह, मसैली, वादरा असे ६०-७० गावातील पोलीस पाटील, सरपंच, शेतकरी, महिला बचत गट सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.