लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्वच महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून यावरुन पालकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण होते.कोरोनो आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आणि याचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनला दिले. तसेच यासंबंधिचे परिपत्रक सुध्दा काढले. मात्र यानंतरही सोमवारी (दि.१६) गोंदिया, देवरी,आमगाव आणि सालेकसा येथील अनेक शाळा आणि महाविद्यालय सुरू होती. तर काही शाळांमध्ये परीक्षा सुध्दा सुरू होत्या. दरम्यान काही पालकांना ही बाब खटकल्याने त्यांनी शाळा आणि महाविद्यालयात जावून याबाबत विचारणा केली तेव्हा मंगळवारपासून शाळा आणि महाविद्यालय बंद ठेऊ असे सांगितले.तर काही शाळेच्या व्यवस्थापनाने आमच्यापर्यंत आदेश पोहचले नसल्याचे सांगितले. दरम्यान पालकांनी आमच्या पाल्यांच्या आरोग्याची जवाबदारी कोण घेणार असा सवाल करीत याची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदेशाचे पालन न करणाºया शाळांवर कारवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील शाळा आजपासून बंद राहणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पूर्वी केवळ महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी (दि.१६) ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालय,अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे आदेश सुध्दा सोमवारी काढण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुध्दा बंद ठेवण्यात याव्या ही पालकांची मागणी मार्गी लागली आहे.मंगळवारपासून (दि.१७) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुध्दा आता बंद राहणार आहे.पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा सुध्दा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार आहे.शासकीय कार्यालयांमध्ये उपाय योजना नाहीकोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र दक्षता बाळगण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र विविध कामासाठी नागरिकांची गर्दी होणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये कसलीच उपाय योजना केली जात नव्हती. जि.प., पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, प्रशासकीय, बस स्थानक, बँक कार्यालयात मास्क वापरण्याचा अभाव दिसून आला. तर काही कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च मास्क खरेदी करुन लावले होते.
प्रशासनाच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी शाळा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST
महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून यावरुन पालकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण होते.
प्रशासनाच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी शाळा सुरुच
ठळक मुद्देशासन निर्देशाचा पडला विसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता